Chandrashekhar Bawankule : होय, तेव्हा अजित पवारांनीच रोखला विदर्भाचा विकास...

महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचा विषय तातडीने मंत्रिमंडळात व सभागृहात आणून मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने २०२१ ची लोकसंख्या जाहीर होण्यापूर्वीच महापालिका, जिल्हा परिषदेत सदस्य संख्या वाढवण्याची चूक केली होती. ती चूक आता एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून सुधारण्यात आली आहे. आता नगरपालिका, नगर पंचायतीमध्ये वाढवलेली सदस्य संख्या कमी करावी. २०११ च्या लोकसंख्येनुसार सदस्य संख्या कराव्या, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

विदर्भ, (Vidarbha) मराठवाडा, (Marathwada) उर्वरित महाराष्ट्राच्या (Maharashtra) विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी वैधानिक मंडळ तयार केले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आधी राज्यपाल नियुक्त १२ आमदार द्या, तर विदर्भ वैधानिक महामंडळ देऊ, अशी आडमुठी भूमिका घेत विदर्भाचा विकास रोखला. घाईघाईत अल्प मताच्या मंत्रिमंडळात त्यांनी याबाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. आता बहुमताच्या सरकारने तातडीने विदर्भ वैधानिक विकास मंडळ, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचा विषय तातडीने मंत्रिमंडळात व सभागृहात आणून मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

प्रसारमाध्यमाशी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या निर्णयात काल, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारणा करून शिंदे-फडणवीस सरकारने योग्य कायदेशीर पाऊल उचलल्याचे ते म्हणाले. परंतु नगरपालिका, नगर पंचायतीमध्ये मविआ सरकारने २०११ ची लोकसंख्या डावलून सदस्य संख्या वाढवली आहे. त्यामुळे नगरपालिका, नगर पंचायतीमध्ये वाढवलेली सदस्य संख्या कमी करावी. २०११ च्या लोकसंख्येनुसार सदस्य संख्या करावी, अशी मागणी केली आहे. जिल्हा परिषद, महापालिकेत २०११ च्या लोकसंख्येचा आधार घेतला आहे. नगर पालिकेतही हाच आधार घेत जुनीच सदस्य संख्या कायम ठेवून निवडणूक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
बावनकुळे म्हणाले, महाविकासच्या काळातील प्रभाग रचना रद्द करा !

नगर विकास व ग्राम विकास विभागाला नव्या लोकसंख्येशिवाय सदस्य संख्या वाढवता येत नाही. महाविकास आघाडी सरकारने सरकारने आपल्याच मताने लोकसंख्येत साडेचार टक्के वाढ दाखवली अन् सदस्य संख्या वाढवली. ही मोठी चूक होती. ही चूक सुधारण्याची गरज होती. त्यात शिंदे-फडणवीस सरकारने सुधारणा केली. हा कायदेशीर निर्णय आहे. जुन्या सदस्य संख्येप्रमाणे ओबीसी व इतर आरक्षणासह निवडणुका घ्याव्या लागेल. निवडणुकीला विलंब झाला तरी चालेल पण चुकीची निवडणूक होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in