Yavatmal APMC Results : यवतमाळ जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांचा उठला ‘बाजार’ !

Pusad : पुसदमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसेची निर्विवात सत्ता आली आहे.
Congress Leader Balasaheb Mangulkar with party Workers.
Congress Leader Balasaheb Mangulkar with party Workers.Sarkarnama

Yavatmal District APMC Election Results : सात बाजार समितीसाठी काल, शुक्रवारी (ता. २८) मतदान व मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर अनपेक्षित निकाल हाती आले. मतदारांनी सत्ताधाऱ्यांना डावलत विरोधकांना कौल दिला. सात बाजार समित्यांपैकी दिग्रस, यवतमाळ व बाभुळगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली. तर वणी, महागावमध्ये भाजप, पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर नेरमध्ये शिंदे गट - राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाले. (The Mahavikas Aghadi came to power over the market committee)

यंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अत्यंत चुरस बघायला मिळाली. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदे गट, अशी लढत अपेक्षित होती. काही बाजार समित्या सोडल्यास बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. दिग्रस बाजार समितीत पालकमंत्री संजय राठोड विरुद्ध माजी मंत्री संजय देशमुख अशी थेट लढत झाली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत महाविकास आघाडीला १४ जागांवर विजय मिळाला. मतदारांनी पालकमंत्री संजय राठोड गटाच्या विरोधात कौल दिला.

राठोड गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. यवतमाळ बाजार समितीत काँग्रेस-ठाकरे गटाने पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे. याठिकाणी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र पॅनल होते. यवतमाळ बाजार समितीत काँग्रेस-ठाकरे गटाला ११ जागा मिळाल्या आहेत. भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले. तीन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. बाभुळगाव बाजार समितीत माजी मंत्री आमदार अशोक उईके गटाला हादरा बसला आहे. १८ पैकी १४ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. भाजपला केवळ चार जागा मिळाला.

यापूर्वी बाभुळगाव बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व होते. पुसदमध्ये माजी मंत्री मनोहर नाईक यांची जादू पुन्हा बघायला मिळाली. १८ पैकी १८ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. नेर बाजार समिती शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस-ठाकरे गट अशी लढत झाली. यात शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेसला १० तर काँग्रेस-ठाकरे गटाला आठ जागा मिळाल्या. वणी तसेच महागाव बाजार समिती भाजप-शिंदे गटाचा बोलबाला दिसून आला.

Congress Leader Balasaheb Mangulkar with party Workers.
Digras APMC Results : राठोडांच्याच मतदारसंघात देशमुखांनी उडवला त्यांचा धुव्वा, पुढील कारकिर्दीसाठी दिला इशारा !

वणी बाजार समितीत (BJP) भाजप-शिंदे (Eknath Shinde) गटाला १४ तर महाविकास आघाडीला केवळ चार जागा मिळाल्या. महागाव बाजार समितीमध्ये माजी मंत्री मनोहर नाईक यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. आत्तापर्यंत बाजार समितीवर नाईक परिवारांच्या नेतृत्वात सत्ता होती. यंदा भाजप-शिंदे गटाने १२ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) पराभूत केले. महाविकास आघाडीला याठिकाणी केवळ सहा जागा मिळाल्या.

आठ बाजार समितीत उद्या (ता. ३०) मतदान..

दारव्हा, बोरी अरब, कळंब, राळेगाव, झरीजामणी, मारेगाव, आर्णी व घाटंजी या आठ बाजार समितीसाठी उद्या, रविवारी (ता. ३०) मतदान होणार आहे. सात बाजार समित्यांमध्ये चार बाजार समितीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिसला. त्यामुळे या बाजार समिती ताब्यात ठेवण्यासाठी नेत्यांमध्ये चुरस वाढली आहे. १४४ जागांसाठी ३२४ उमेदवार रिंगणात आहेत. यातील बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडी तसेच युतीत फूट पडली असून अभद्र युती झाली आहे. त्यामुळे मतदार याठिकाणी कोणाला कौल, देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com