बाहेरून येऊन अमरावतीला भडकावू नका, ठाकूरांचा फडणवीसांवर पलटवार

ज्यांनी कोणी दंगल भडकवली त्याला सोडले जाणार नाही, असे यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या.
 बाहेरून येऊन अमरावतीला भडकावू नका,  ठाकूरांचा फडणवीसांवर पलटवार
Yashomati Thakur, CongressSarkarnama

पुणे : अमरावती हिंसेच्या (Amravati Violence) घटनेवरून विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर (State Government) व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर केलेल्या टीकेला ठाकूर यांनी फडणवीसांची पत्रकारपरिषद संपताच मीडियाशी संवाद साधत त्यांना प्रत्यूत्तर दिले आहे.

Yashomati Thakur, Congress
राणेंचा सुपडा साफ ; उदय सामंतांनी बाजी मारली, सहकार पॅनल विजयी

यशोमती ठाकूर म्हणाल्या, फडणवीस हे जबाबदार नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत, असे वाटले होते. मात्र, त्यांनी आज (ता.21 नोव्हेंबर) जे बेजबाबदारपणे विधाने केली आहे. त्यांना केलेले एक-दोन वक्तव्य आपल्याला आवडले नसून ते भडकवत असल्यासारखे वाटले. हिंदू-मुस्लिम करू नका. फडणवीस हे अर्धवट माहिती घेऊन बोलत असून त्यांनी पूर्ण अभ्यास करावा. असा टोलाही ठाकूर यांनी फडणवीसांना लगावला आहे.

फडणवीसांनी उत्तर देतांना त्या म्हणाल्या की, 12 तारखेला घडलेली घटना निंदनीय आहे. मात्र, 13 तारखेची घटना त्यापेक्षाही निंदनीय आहे. दोन्ही आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. महाविकास आघाडी सरकार हे निष्पक्षपाती भूमिका घेत आहे. ज्यांनी कोणी दंगल भडकवली त्याला सोडले जाणार नाही. मात्र, आता अमरावती शांत झाली आहे. कोणीही बाहेरून येऊन भडकावू नका, असे आवाहन सुद्धा ठाकूर यांनी केले आहे.

Yashomati Thakur, Congress
अमरावती हिंसाचार हा पूर्वनियोजित, त्या मोर्चाची चौकशी करा- फडणवीस

दरम्यान, फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत राज्य सरकार व ठाकूर यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, ठाकूर ह्या 12 तारखेच्या घटनेवर का बोलत नाहीत? त्यांची मते कमी होणार म्हणून त्या बोलत नाहीत का? की या मोर्च्यांची माहिती होती म्हणून त्यात बोलत नाहीत का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले होते. तसेच, राज्यात दंगल भडकावण्यासाठी कट होता का याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याबरोबरच 12 तारखेला अमरावतीत निघालेल्या मोर्चाला परवानगी होती की नाही? होती तर कुणी दिली? ज्यांनी परवानगी दिली त्याने काय विचार करून दिली होती? त्याची चौकशी झाली पाहिजे. परतीच्या वेळी काही समाजकंटकांनी विशिष्ट धर्माच्या दुकानांना व लोकांना टार्गेट केले. असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले होते.

Related Stories

No stories found.