रखडलेल्या कामाचे होणार वर्ल्ड रेकॉर्ड; पाच दिवसांत पूर्ण करणार 40 किलोमीटरचा रस्ता

Vidarbha news| Nitin Gadkari| राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अकोल्यात आयोजित सभेत माफी मागितली.
रखडलेल्या कामाचे होणार वर्ल्ड रेकॉर्ड; पाच दिवसांत पूर्ण करणार 40 किलोमीटरचा रस्ता
Vidarbha news| Roads PoliticsSarkarnama

अमरावती: गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम केवळ पाच दिवसांत पूर्ण करण्याचा निर्धार एका कंत्राट कंपनीने केला आहे. लोणी ते मूर्तिजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील 40 किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम 3 जून ते 7 जून दरम्यान न थांबता करून विश्वविक्रम करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यासाठी कंपनीने तयारीही सुरु केली आहे. (Vidarbha World Recoord news)

अमरावती अकोला या राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजुच्या दोन लेनमधील 75 किमी पर्यंतचे चौपदरीकरणाचे काम चार दिवसांत करण्याचे नियोजन एका खाजगी कंत्राटदार कंपनीने घेतले आहे. या रस्त्याच्या कामाला आज सकाळ पासून युद्ध स्तरावर सुरवात झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून या महमार्गाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करणार आहे. कारण 108 तासात 75 किमीचा रस्ता पूर्ण होणार असून संपूर्ण राज्याचे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vidarbha news| Roads Politics
केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; 'हरिजन' ऐवजी करणार 'डॉ. आंबेडकर' शब्दाचा वापर

विशेष म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अकोल्यात आयोजित सभेत माफी मागितली. अमरावती ते अकोला दरम्यानच्या कामाची गती नसल्याने याबाबत मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यांचवेली गडकरींनी अभियंत्यांना व कंत्रादारांना कामाची गती वाढविण्याचेही निर्देश दिले होते. त्यामुळे अमरावती-अकोल्यादरम्यान कमी वेळात अधिक काम करण्याची योजना कंत्राटदार कंपनीने आखली आहे. त्यानुसार आजपासून (3 जून) रोजी सकाळी सात वाजता या विक्रमी कामाला सुरुवात झाली आहे. 7 जूनपर्यंत सलग काँक्रिटीकरणाचे काम करून ७० ते ८० किलोमीटर लेंथचे काम करण्याचा कंत्राटदारांचा मानस आहे.

सार्वजनिक कार्य प्राधिकरणाचा यापूर्वीचा विक्रम मोडणार

राज पथ इन्फ्राकॉनने सांगली- सातारा दरम्यान,पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान,सतत २४तास रस्ता तयार करीत विश्वविक्रम स्थापित केला होता. सार्वजनिक कार्य प्राधिकरण- अश्गुल यांनी दोहा, कतार येथे यापूर्वी विक्रम नोंदविला होता. तब्बल 242 तासांचा म्हणजेच 10 दिवस नॉनस्टॉप बांधकाम करून, २५ किलोमीटर रस्ता निर्मितीचा विक्रम केला होता. राज पथ इन्फ्राकॉनने आता तो रेकॉर्ड मोडण्याचा विडा उचलला आहे. लोणी-मूर्तीजापूर दरम्यान,विश्वविक्रम रचण्याचा प्रयत्न राहणार आहे. ही आव्हानात्मक कामगिरी यशस्वी झाल्यास, राज पथ इन्फ्राकॉन प्रा.लि. या रस्ते बांधकाम क्षेत्रातील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in