
दवलामेटी ग्रामपंचायतीच्या सरपंच रिता उमरेडकर व उपसरपंच प्रशांत केवटे यांच्यावर आज ८ मार्च रोजी महिलादिनी नागपूर ग्रामीणच्या तहसीलदारांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस बजावली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तहसीलदारांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक महिला दिनीच एका महिला सरपंचावर अशा प्रकारच्या अविश्वास प्रस्तावावर कार्यवाही करणे म्हणजे तहसील कार्यालय कुणाच्या तरी दबावाखाली कार्यवाही करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास वाटकर यांनी केला. दोन वर्षाआधी दवलामेटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या निर्वाचित उमेदवार रिता उमरेडकर यांची सरपंचपदी तर काँग्रेसचे प्रशांत केवटे यांची उपसरपंचपदी वर्णी लागली होती.
कालांतराने येथे विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाच्या ४ सदस्यांवर अतिक्रमणात घर बांधल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाई करून त्यांना अपात्र घोषित केले होते. तदनंतर एका सत्ताधारी सदस्याला तीन अपत्य असल्याचे कारण पुढे ठेवून विरोधी पक्षाने दबावतंत्राचा वापर करीत त्याला आपल्याकडे ओढून घेतले व नुकतीच नागपूर ग्रामीणचे तहसीलदार वानखेडे यांच्याकडे अविश्वास प्रस्तावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
८ तारखेला म्हणजे उद्या जागतिक महिला दिनी महिला सरपंचावर अविश्वास प्रस्ताव सभा आयोजित करण्याबाबत नागपूर (Nagpur) तहसील कार्यालयातर्फे निश्चित करण्यात आले. ही बाब परिसरात माहिती होताच नागरिक तहसीलदार व विरोधी पक्षाच्या या कृतीवर चांगलेच संतप्त झाले आहेत.
जागतिक महिला दिनी (Women's Day) आयोजित अविश्वास प्रस्ताव सभा पुढे ढकलण्यात यावी. तसेच विरोधी सदस्यांनी आरोप करून अविश्वास प्रस्ताव आणला आहे. तो पूर्वग्रहदूषित व दबावाखाली व खोटा असल्याचे मत वंचित (Vanchit) बहुजन आघाडीने व्यक्त केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.