Women : महिला दिनी महिला सरपंचावर अविश्वास प्रस्ताव पारित, कॉंग्रेसच्या मदतीने भाजपची खेळी !

BJP : भाजपची ही खेळी यशस्वी झाली. मात्र नागरिकांत संताप दिसून आला.
Dawalameti, Nagpur.
Dawalameti, Nagpur.Sarkarnama

नागपूर शहरानजीकच्या दवलामेटी ग्रामपंचायतीच्या सरपंच रिता उमरेडकर व उपसरपंच प्रशांत केवटे यांच्यावर आज ८ मार्च रोजी महिला दिनीच ग्रामपंचायत दवलामेटीच्या सभागृहात नागपूर ग्रामीणचे तहसीलदार आकाश वानखेडे यांच्या उपस्थितीत ९ विरुद्ध ३ मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित झाला.

भाजपची ही खेळी यशस्वी झाली. मात्र नागरिकांत संताप दिसून आला. काँग्रेस समर्थीत सदस्य अर्चना चौधरी व वंचित बहुजन आघाडी समर्थीत साधना शेंद्रे यांनी विरोधी पक्षाच्या बाजूने मतदान केल्याने नागरिकांनी सभागृहाबाहेर त्यांच्या व स्थानिक आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्य म्हणजे एक अपात्र सदस्य सिद्धार्थ ढोके यांनी आयुक्त कार्यालयाकडून सोमवारी स्थगिती आदेश आणला होता. nagpur

तो आदेश सोमवारी रद्द झाल्याचे कळवण्यात आल्याने त्याला सभागृहातच येऊ दिले नसल्याचे समजते. यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष दिसून आला, तर प्रशासन दबावतंत्रात काम करीत असल्याची चर्चाही सभागृहाबाहेर नागरिकांमध्ये होती. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने भाजपचे गजानन रामेकर, सतीश खोब्रागडे, छाया खिल्लारे, रश्मी पाटील, शकुंतला अभ्यंकर, उज्वला गजभिये, शीतल वानखेडे, कॉंग्रेसच्या अर्चना चौधरी, वंचितच्या साधना शेंद्रे अशा एकूण ९ सदस्यांनी मतदान केले.

प्रस्तावाच्या विरोधात सरपंच रिता उमरेडकर, उपसरपंच प्रशांत केवटे, सदस्य रक्षा सुखदेवे, असे एकूण ३ सदस्यांनी मतदान केले. जागतिक महिला दिनी एका महिला सरपंचावर अशा प्रकारचा अविश्वास प्रस्ताव आणणे हे महिलांच्या सन्मानार्थ कितपत योग्य आहे, असा सवाल करीत परिसरातील नागरिक चांगलेच संतापले होते. २ वर्षाआधी दवलामेटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) निर्वाचित उमेदवार रिता उमरेडकर यांची सरपंच पदी तर काँग्रेसचे प्रशांत केवटे यांची उपसरपंच पदी वर्णी लागली होती.

Dawalameti, Nagpur.
Nagpur G20 : जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांसमोर सिटीझन्स फोरम करणार ‘हे’ आंदोलन!

कालांतराने येथे विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाच्या ४ सदस्यांवर अतिक्रमणात घर बांधल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून (Collector Office) कारवाई करून त्यांना अपात्र घोषित केले होते. तदनंतर एका सत्ताधारी सदस्याला तीन अपत्य असल्याचे कारण पुढे ठेवून विरोधी पक्षाने दबाव तंत्राचा वापर करीत त्याला आपल्याकडे ओढून घेतले या घटनेमुळे गावातील नागरिक विरोधी पक्षाच्या या कृतीवर चांगलेच संतापले आहेत.

जागतिक महिला दिनी झालेली अविश्वास कार्यवाही महिलांचा अपमान करणारी असल्याचे मत सरपंच रिता उमरेडकर यांनी व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. अनुचित घटना घडू नये, यासाठी वाडी पोलिसांनी (Police) तगडा बंदोबस्त ठेवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com