Farmers:‘या’ घोषणेतून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे नुकसानच केले, पाच हजारांचा फटका !

Eknath Shinde : ५० क्विंटल मर्यादेची अट शिथिल करण्याची गरज आहे, असे धान उत्पादक शेतकरी बोलत आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

CM Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली. परंतु ही घोषणा शेतकऱ्यांच्या फायद्याऐवजी नुकसानदायकच आहे. त्यांना खरच शेतकऱ्यांचा फायदा करायचा असेल तर बोनस प्रतिक्विंटल १ हजार रुपये करून ५० क्विंटल मर्यादेची अट शिथिल करण्याची गरज आहे, असे धान उत्पादक शेतकरी बोलत आहेत.

वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती यामुळे अडचणीत नेहमीच अडचणीत येत असलेल्या धान उत्पादकांना विचारात घेऊन आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त राज्य शासन प्रोत्साहन राशी देत असते. २०१८-१९ मध्ये ५०० रुपये प्रतिक्विंटल तर सन २०१९-२० मध्ये ७०० रुपये बोनस देण्यात आला. हा बोनस ५० क्विंटलच्या मर्यादेत होता. आता मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी हेक्टरी १५ हजार रुपये २ हेक्टरच्या मर्यादेत बोनस देण्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा शेतकऱ्यांसाठी (Farmers) फायदेशीर नाही, तर नुकसान करणारी आहे. जुन्या निकषानुसार ५० क्विंटलसाठी ७०० रुपये प्रमाणे ३५ हजार रुपये होतात. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार ३० हजार रुपयेच मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे ५ हजार रुपयांचे नुकसान होणार आहे.

या घोषणेतून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. २ हेक्टरची मर्यादा काढून सरसकट बोनस रक्कम देण्यात यावी. तसेच जे शेतकरी धान खरेदी केंद्रावर धान विकणारे असून त्यांना प्रति क्विंटल सरसकट बोनस देण्यात यावा. सोबतच तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये प्रतिक्विंटल १ हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी केली होती. आता त्याच मागणीनुसार प्रतिक्विंटल १ हजार रुपये बोनस देण्यात यावा.

-राजू कारेमोरे, आमदार, तुमसर.

आधीच्या तुलनेत आत्ताची बोनस देण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. बोनसची रक्कम कमी मिळत असली तरी ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. त्यामुळे व्यापारी बनावट शेतकरी तयार करून करत असलेला घोळ थांबवता येईल.

-किशोर जोरगेवार, अपक्ष आमदार, चंद्रपूर

Eknath Shinde
Eknath Shinde News: त्यावेळी ‘वर्षा’वर पाटीभर लिंबं सापडली होती : एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

राज्यकर्ते सभागृहात निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घोषणा करत असतात. मात्र प्रत्यक्षात जेव्हा शासन निर्णय काढला जातो. त्यावेळी अनेक जाचक अटी तयार करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. आतासुद्धा ही घोषणा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासायचे असेल तर १ हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बोनस देण्यात यावा.

- श्यामराव झाडे, शेतकरी, ब्रम्हपुरी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in