Winter Session News: पंतप्रधान मोदींवर टिप्पणी! अभिजीत वंजारी अन् प्रसाद लाड भिडले

Winter Session : गुजरात निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं. त्यात महाराष्ट्र सरकारचा देखील मोठा वाटा .
Prasad Lad, Narendra Modi, Abhijeet Wanjarri
Prasad Lad, Narendra Modi, Abhijeet Wanjarri Sarkarnama

Abhijit Wanjarri Vs Prasad Lad News : हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या घोटाळे बाहेर काढले जात आहे. या घोटाळ्यांवरुन संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील जोरदार मागणी केली जात आहे. याचदरम्यान हिवाळी अधिवेशनातील विधान परिषदेच्या सभागृहात बुधवारी (दि.28) काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. (Abhijit Wanjarri Vs Prasad Lad News)

नागपूरचे काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिप्पणी केली..यावरुन काहीवेळ राजकीय वातावरण तापलं.

अभिजीत वंजारी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) आणि महाराष्ट्राचं सरकारचं मी अभिनंदन करणार आहे. कारण नुकत्याच गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं. त्यात महाराष्ट्र सरकारचा देखील मोठा सहभाग आहे. आपल्या सरकारच्या उद्योगखात्यामार्फत जे काही उद्योग गुजरातला पळविले गेले. त्यामुळे भाजपला तेथील निवडणुकांमध्ये बर्यापैकी यश मिळालं. गुजरात निवडणुकीवेळी राज्यातील बरेचसे उद्योग गुजरातला पळविले गेले.

यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वंजारी यांच्या मोदींबद्दल केलेल्या टिप्पणीवर आक्षेप घेतला. त्यावर वंजारी म्हणाले, तुम्ही नेहरुंबद्दल बोलू शकता मग आम्ही मोदींबद्दल बोलू शकत नाही का? यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी आक्रमक भूमिका घेत वंजारी यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक चकमक घडली. यात शेवटी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी मध्यस्थी करावी लागली. त्यांच्या मध्यस्थीनंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली.

Prasad Lad, Narendra Modi, Abhijeet Wanjarri
Vijay Shivtare : विजय शिवतारे अॅक्शन मोडवर; ‘महिंद्रा’ प्रकल्पासाठी थेट नागपूरात मुख्यमंत्र्यांना साकडे

वंजारी यांनी म्हणाले, आपल्या राज्यातील उद्योग गुजरातला गेले. त्यामुळे इथे बेरोजगारी वाढली. पण टाटा एअरबस , वेदांता फॉक्सकॉन यांसारखे मोठे उद्योग प्रकल्प बाहेर गेले. आता मुंबई महापालिकांच्या आयुक्तांनी दादासाहेब फाळके यांच्या काळातील फिल्म इंडस्ट्रीपासून सुरु झालेले स्टुडिओ बंद करण्याबाबत नोटीस जारी केली आहे. आणि त्याचवेळी गुजरातमधील मंत्र्याने चित्रपटसृष्टीसाठी ज्या काही सुविधा लागतील त्या पुरविण्यात येईल असं विधान केलं आहे. त्यामुळे इतर उद्योगांप्रमाणेच महाराष्ट्रातील चित्रपटनगरी, बॉलिवूड हे गुजरातला नेणार आहात का?

Prasad Lad, Narendra Modi, Abhijeet Wanjarri
Imtiaz Jalil : माजीमंत्री देसाईंकडून कोट्यावधींचा औद्योगिक जमीन घोटाळा...

यावर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जे काही दोन तीन मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले असं भासविण्यात येत आहे. या अगोदरच्या सरकारने या उद्योगांबाबत कोणत्याही भूमिका घेतली नाही. किंवा उद्योगांसाठी पूरक निर्णय जलदगतीने घेतले नाही. त्यांना सवलती देण्यात आल्या नाहीत.

उलट, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पांबाबत अनेक बैठका घेतल्या, त्यांना सवलती देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. पण तोपर्यंत संबंधित कंपन्यांनी त्यांना आधीच्या सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास शिंदे फडणवीस सरकार जबाबदार आहे असं जे काही रंगून रंगून सांगितलं जात आहे ते योग्य नाही.

तसेच आमदार वंजारी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना देसाई यांनी महाराष्ट्रातील चित्रपटनगरी,बाँलिवूड हे कदापि गुजरातला जाणार नाही असेही स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com