आघाडी कायम राहणार की नाही? नाना म्हणाले, ते हायकमांड ठरवतील...

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे संतप्त विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले.
Nana Patole and Soniya Gandhi
Nana Patole and Soniya GandhiSarkarnama

नागपूर : महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे बऱ्यापैकी जमले. पण कॉंग्रेसला अद्यापही या आघाडीत मानाचे स्थान मिळालेले नाही. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नेहमीच खटके उडतात. आता भंडारा - गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये वातावरण तापले आहे.

राष्ट्रवादीने (NCP) आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे संतप्त विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना जशास तसे उत्तर दिले. तर नानांनी मग पहाटेच्या शपथविधीची आठवण पवारांना करवून दिली. मग या वादात उडी घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी (Ramdas Athavale) उडी घेतली. हिंमत असेल तर कॉंग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हानच आठवलेंनी देऊन टाकले. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील वाद आणखीनच धुमसत चालला आहे. त्यात पटोलेंनी हायकमांडकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कायम राहणार की नाही, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.

गोंदिया-भंडारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद आता हाय कमांडपर्यंत पोचला आहे. पटोले यांनी याची तक्रार थेट सोनिया गांधी यांच्याकडे केली असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. यावर पटोले यांनी राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ती राष्ट्रवादीला चांगलीच झोंबली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांची राजकीय पार्श्वभूमी काढून केवळ हेडलाईनसाठी पटोले असे वक्तव्य करीत असल्याचा आरोप केला होता. त्यावर पटोले यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देऊन पवार यांचीही पार्श्वभूमी निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. पटोले यांनी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत राष्ट्रवादीच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करून सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली. राष्ट्रवादीकडून नेहमीच भाजपची बाजू घेतली जाते. हा पक्ष काँग्रेसचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे पटोले यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Nana Patole and Soniya Gandhi
पटेल हे पटोले यांचा पतंग कापत राहिले....मग नानाही डाव टाकू लागले

यासंदर्भात आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना आपण सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली असल्याचे पटोले यांनी सांगितले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी तयार करण्यात आली आहे. मात्र, ज्या उद्देशाने आघाडी स्थापन झाली त्यास राष्ट्रवादीकडून वारंवार तिलांजली देण्याचे काम होत आहे. अशा परिस्थितीत आघाडी कायम राहणार काय? अशी विचारणा केली असता तो निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडला असल्याचे पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com