राज ठाकरेंचा विदर्भ दौरा भाजपला ठरणार आव्हान? बावनकुळे म्हणाले...

BJP-MNS| Chandrashekhar Bavankule|आमचा प्रयत्न हा फक्त भाजपसाठी आहे.
BJP-MNS| Chandrashekhar Bavankule|
BJP-MNS| Chandrashekhar Bavankule|

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि आमचा पार्लमेंटरी बोर्ड युतीत लढणार, असं ठरवलं आहे. युतीत ज्या सीट ज्यांच्याकडे जातील, त्यांची पुर्ण संघटना त्यांच्या मागे उभी करणार आहे. त्यासाठीच आम्ही काम करत आहोत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ज्या ज्या सीटचं वाटप करतील आणि केंद्रीय नेतृत्त्वाकडून त्याला मान्यता मिळेल, नंतर जो उमेदवार येईल त्या उमेदवाराला शंभर टक्के निवडूण आणण्याची जबाबदारी भाजपची असेल. अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे.

नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत, आगामी निवडणूकीत त्यांचे आव्हान असेल का, या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, मनसेला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. जेव्हा निवडणूका येतील तेव्हा त्यांचं काम ते करतील आमचं काम आम्ही करु. आव्हानाच म्हणाल तर ते जनता ठरवेल. लोकशाहीत आव्हानं येतात, मतपेटी बंद होते, या मतपेटीतूनच कोण खरं आणि कोण खोटं हे समोर येत असतं. त्यामुळे आताच सांगता येत नाही.

BJP-MNS| Chandrashekhar Bavankule|
आधी लग्न करून बघा, संसार काय असतो ते कळेल ; कदमांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

यावेळी तिसऱ्या भिडूसाठी जागा नाही का, असा सवाल विचारल्यावर बावनकुळे म्हणाले की,आज एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजपची युती आहे, एनडीएचे काही घटकपक्षही आहेत. रामदास आठवले यांचा पक्ष आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात काम करतात, त्यांच्याशी आमची युती आहे. पण मनसेची आज आमची कोणतीही युती नाही, त्यामुळे याच्यात कोणताही राजकीय अर्थ काढू नये. यावेळी राजकीय चर्चा होणार नाही.

पण आमचा प्रयत्न हा फक्त भाजपसाठी आहे. बुलढाण्यात भुपेंद्र यादव लोकसभेसाठी आले आहेत. त्यामुळे आमचं ठरल आहे की, विदर्भात भाजपच्या ११ लोकसभेच्या सीट निवडून याव्यात यासाठी आहे आमचा प्रयत्न आहे की विदर्भात ४५ प्लस विधानसभा सीट निवडून याव्यात, आम्ही सर्व जिल्हापरिषदा, महापालिका निवडून याव्यात यासाठी प्रयत्न करत आहोत. आज ग्राम पंचायतीचे निकालही भाजपच्या बाजूने येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. जनतेनेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्यभरात आज शिंदे गट आणि भाजपच्या बाजूनेच निकाल येणार आहेत. जनतेने आम्हाला स्वीकारलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in