पक्षसंघटनेत उत्तम कामगिरी बजावलेल्या आमदार समीर मेघेंना मिळणार का मंत्रिपद?

आमदार समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांना सन २०१४ मध्ये ऐनवेळी भाजपने (BJP) उमेदवारी घोषित केली. या निवडणुकीत आमदार समीर मेघे यांची आमदारपदी वर्णी लागली.
MLA Samir Meghe
MLA Samir MegheSarkarnama

हिंगणा : गेल्या सात वर्षांपासून हिंगणा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार समीर मेघे यांनी भाजपच्या संघटन बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. नागपूर ग्रामीण मधील युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. यामुळे नव्याने सत्तारूढ होत असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळण्याची राजकीय शक्यता वर्तवली जात आहे.

हिंगणा विधानसभा क्षेत्रावर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे वर्चस्व होते. यानंतर भाजपने (BJP) सन २००९ मध्ये प्रथमच तत्कालीन आमदार विजय पाटील घोडमारे यांच्या रूपाने पहिल्यांदा मतदार संघात भाजपने प्रवेश केला. यानंतर आमदार समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांना सन २०१४ मध्ये ऐनवेळी भाजपने उमेदवारी घोषित केली. या निवडणुकीत आमदार समीर मेघे यांची आमदारपदी वर्णी लागली. भाजपचे राज्यात सरकार आले. यानंतर आमदार समीर मेघे यांनी हिंगणा विधानसभा क्षेत्रात विकास कामाचा धडाका सुरू केला.

मागील पंचवार्षिक मध्ये कधी नव्हे इतके विकास कामे हिंगणा विधानसभा क्षेत्रात झाली. पुन्हा दुसऱ्यांदा समीर मेघे यांना सन २०१९ मध्ये विधानसभा क्षेत्रात उमेदवारी देण्यात आली. प्रचंड मताधिक्याने ते दुसऱ्यांदा विजयी झाले. आमदार समीर मेघे यांनी अडेगाव मुख्यमंत्री दत्तक गाव घेतले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणा विधानसभा क्षेत्रातील कवडस व फेटरी ही दोन गावे मुख्यमंत्री दत्तक गाव म्हणून घेतली. या दोन्ही गावांत तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्वतः भेट देऊन विकास कामे केली.

MLA Samir Meghe
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजप करणार शिवेंद्रराजेंना मंत्री

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर भाजपच्या पक्षसंघटनेत समीर मेघे यांच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या. नागपूर जिल्हा परिषदेच्या सन २०२१ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिले. नागपूर जिल्ह्याच्या आगामी होणाऱ्या सिनेट निवडणुकीसाठी त्यांना निवडणूक प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली. या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. सिनेट निवडणूक होणे, बाकी असले तरी पक्षाची मोर्चे बांधणी त्यांनी जिल्ह्यात उत्तमरीत्या केली. नागपूर ग्रामीण भाजप मध्ये आमदार समीर मेघे हा तरुण चेहरा आहे. विकास कामे करताना सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे त्यांनी केली. सद्यःस्थितीत वाडी, बुट्टीबोरी, वानाडोंगरी नगरपरिषद व हिंगणा नगरपंचायतीवर भाजपची सत्ता आहे.

जनतेची विकास कामे मोठ्या प्रमाणात शहरी भागात सुरू आहे. केंद्र सरकारची रूअर्बन योजना मोठ्या प्रमाणात क्षेत्रात राबवून कोट्यवधी रुपयांची विकास कामे करण्यात आली. वरिष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांचे संबंध भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी उत्तम आहेत. मागील सात वर्षांची पक्षातील वाटचाल पाहता आमदार समीर मेघे यांची नव्याने स्थापन होणाऱ्या फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com