वकील सदावर्ते आणि जयश्री पाटील यांना बेल की जेल?

गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या होणार सुनावणी
Adv. Jayshree Patil & Adv. Gunratna Sadavarte
Adv. Jayshree Patil & Adv. Gunratna SadavarteSarkarnama

अकोला : एसटी (ST Strike) कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चर्चेत आलेले अॅड गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte)आता त्याच कारणाने अडचणीत देखील आले आहेत. त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. अॅड सदावर्ते व त्यांची पत्नी जयश्री पाटील (Adv. Jayshree Patil) यांची कोठडी वाढणार की त्यांना जामीन होणार हे उद्या ठरणार आहे. यासंदर्भात त्यांच्या अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) अर्जावर उद्या सुनावणी होत आहे.

Adv. Jayshree Patil & Adv. Gunratna Sadavarte
मशिदीजवळ भोंगे लावाल तर ४ महिने जेल अन् तडीपारी!

एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याप्रकरणी अकोट शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. तर उर्वरित दोन आरोपी ऍड. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी अकोट न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर बुधवार (ता. २०) ला अंतिम सुनावणी होणार आहे.

Adv. Jayshree Patil & Adv. Gunratna Sadavarte
राज ठाकरे फसले; मशीदीवरील भोंगे उतरवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेशच नाही!

अकोल्यातील अकोट शहर पोलीस ठाण्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ऍड गुणरत्न सदावर्ते, ऍड जयश्री पाटील, अजय गुजर आणि प्रफुल गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चार आरोपीपैकी अजय गुजर आणि प्रफुल गावंडे यांना अटक करण्यात आली आहे. अकोट येथील न्यायालयात पोलिसांनी सदावर्ते आणि पाटील यांचा ताबा मागण्यांसाठी केलेला अर्ज अकोट न्यायालयाने मंजूर केला, असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते सद्या सातारा पोलिसांच्या अटकेत आहे. वकील सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील, औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून 300 व 500 रुपये गोळा करून 74 हजार 400 रुपयाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या प्रकरणातील आरोपी अजयकुमार गुजर आणि बस वाहक प्रफुल गावंडे हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर आता सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर बुधवारी अकोट न्यायालयात सुनावणी होणार आहे, अशी माहिती ऍड. एस. एस. तट्टे यांनी दिली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com