आमदारांची अर्धांगिनी; गावशिवारावर घालतेय ‘मोहिनी’

आमदार इंद्रनिल नाईक (Indranil Naik) यांची पत्नी मोहिनी यांची कृती गाव शिवारातील शेतकरी कुटुंबांना निश्चितच कुतूहल जागवणारी ठरली.
Mohini Indranil Naik, Vasantrao Naik
Mohini Indranil Naik, Vasantrao NaikSarkarnama

पुसद (जि. यवतमाळ) : महाराष्ट्राला (Maharashtra) वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक (Sudhakarrao Naik) यांच्या रूपाने दोन कर्तबगार मुख्यमंत्री आणि माजी कॅबिनेट मंत्री लोकनेते मनोहर नाईक, असा नाईक घराण्याचा वारसा लाभलेले युवा आमदार इंद्रनील मनोहर नाईक (MLA Indranil Naik) पुसद विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. त्याच वेळी आमदारांच्या अर्धांगिनी मोहिनी इंद्रनील नाईक यांनी लोक संपर्काचे एक पाऊल पुढे टाकले असून मतदार संघातील गाव शिवारावर अक्षरशः मोहिनी घातली आहे.

"गाडी चालली घुंगराची

वाट बाई डोंगराची"

मोहिनी नाईक यांचा धनसळ येथील शेतकरी कुटुंबातील शेतशिवारात बैलगाडी हाकण्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून नुकताच व्हायरल झाला. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी शेलूच्या शेतात नांगर धरल्याचा प्रसंग आवर्जून आठवतो.

नाइकांचे शेती आणि शेतकरी वरील निस्सीम प्रेम किती दृढ होते, हेही प्रकर्षाने लक्षात येते. "माझे आजोबा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे जीवन माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. धनसळ गावातील शेतकरी बांधवांना भेटून खूप आनंद झाला. विशेषतः: महिलांची शेतीसाठीची तळमळ बघितली. शेतीतील त्यांची धडपड पाहताना मी नतमस्तक झाले. बैलगाडी चालवण्याचा आयुष्यातील हा अनुभव विसरू शकत नाही. जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांबद्दल एक वेगळा आदर मनात निर्माण झाला. मोहिनी नाईक यांच्या या शब्दांतून नाईक घराण्याची शेती-शेतकरी त्यांच्याशी असलेली नाळ अधिक घट्ट झाल्या शिवाय राहत नाही.

मोहिनी नाईक समाज माध्यमावर अविरत सक्रिय असतात. त्यांच्या स्टेट्स मध्ये लोक संपर्काची झलक पाहावयास मिळते. कडक उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये त्यांनी कुठलाही लग्नप्रसंग चुकवला नाही. पारंपरिक बंजारा महिलांच्या घोळक्यात त्यांच्याशी प्रेमळ संवाद करताना त्या दिसून येतात. तितक्याच तत्परतेने गाव- वाडी- तांड्यातील लोकांशीही आस्थेने बोलतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com