Kaali : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मूग गिळून गप्प का?

मनिमेकलाई यांची वृत्ती प्रकाशित करणारे ते पोस्टर आहे, असा घणाघात भाजपचे (BJP) प्रदेश प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम (Ad. Dharmpal Meshram) यांनी केला.
Ad. Dharmpal Meshram, BJP.
Ad. Dharmpal Meshram, BJP.Sarkarnama

नागपूर : मदुराई येथे जन्मलेल्या आणि टोरंटो येथे स्थायिक झालेल्या लिना मनिमेकलाई या भारतीय मूळ असलेल्या निर्देशक महिलेने गॉडेस काली (Kali) या डॉक्युमेंट्रीचे प्रकाशित केलेले पोस्टर अतिशय घाणेरडे आणि विकृत मानसिकतेचे प्रदर्शन करणारे आहे. मनिमेकलाई यांची वृत्ती प्रकाशित करणारे ते पोस्टर आहे, असा घणाघात भाजपचे (BJP) प्रदेश प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला.

हे हीन दर्जाचे पोस्टर मनिमेकलाई (Manimeklai) यांनी प्रकाशित केले आहे. नकारात्मक प्रसिद्धी हे जगभर धंदा उभे करण्याचे माध्यम झाल्याचे हल्ली बघायला मिळते. याच प्रयत्नांतून या दिग्दर्शिकेने १०० कोटी हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम हेतुपुरस्सर केले आहे. त्यांचा अजेंडा काय आहे, याचे चिंतन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. केवळ पैसा कमावण्यासाठी हे लोक असे करतात का, हे तपासण्याचीही गरज असल्याचे ॲड. मेश्राम (Ad. Dharmpal Meshram) म्हणाले.

अशा पद्धतीने देवी देवतांचा अपमान करून प्रसिद्धी मिळविणारे, मग ते चित्रपटसृष्टीतील असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रांतील, त्यांच्या विरोधात कठोरता कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्यासाठी तेवढेच कठोर कायदेही तयार केले गेले पाहिजे. तृणमूल कॉंग्रेसच्या (Congress) खासदार महुआ मित्रा यांनी मनिमेकलाई यांचे समर्थन केल्याच माध्यमांमधून कळले. गॉडेस काली या बंगालचे दैवत आहे. त्यांच्याच नावावर मते घेणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banargee) या अद्याप मूग गिळून गप्प का आहेत, असा सवालही ॲड. मेश्राम यांनी उपस्थित केला आहे.

Ad. Dharmpal Meshram, BJP.
नागपूर खंडपीठाचा चरण वाघमारे यांना तात्पुरता दिलासा, उपाध्यक्ष सभापतींची अटक टळली...

ममता बॅनर्जी यांनी अद्याप या प्रकाराबाबत कारवाईसाठी पुढाकार घेतलेला नाही. येवढेच काय तर ब्र शब्ददेखील काढलेला नाही. ही चिंतेची बाब आहे. लिना मनिमेकलाई यांनी आज पुन्हा एक ट्विटमध्ये शि-पार्वतीचे पात्र साकारणाऱ्या कलावंतांना सिगारेट ओढताना दाखवले आहे. जरी ट्विटरने भारतभरातल्या त्यांच्या हॅन्डलवरून ते ट्विट डिलिट केले असले, तर दुसऱ्यांदा अशी हिंमत या महिलेने दाखवणे म्हणजे भारतासारख्या बहुसंख्य हिंदुधर्मीय असलेल्या लोकांना दिलेले आव्हान आहे. या प्रकाराची आम्ही निंदा करतो आणि ट्विटरने मनिमेकलम यांचे अकाऊंट डिलिट केले पाहिजे, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in