प्रदेशाध्यक्षांबद्दल नाराजी असूनही ते नैतिक जबाबदारी स्वीकारत का नाहीत?

डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) म्हणाले, १९९८ मध्ये रणजीत देशमुख प्रदेशाध्यक्ष होते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे उमेदवार राम प्रधान होते.
Dr. Ashish Deshmukh News, Nana Patole News, Maharashtra political news in Marathi
Dr. Ashish Deshmukh News, Nana Patole News, Maharashtra political news in MarathiSarkarnama

नागपूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ आले. पण त्यापूर्वी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्षांना याचा फटका बसला. कॉंग्रेसही यातून सुटली नाही. विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसची ७ मते फुटली होती आणि बहुमत चाचणीला ११ आमदार गैरहजर होते. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मागणी जोर धरत आहे.(Maharashtra political news in Marathi)

यासंदर्भात कॉंग्रेस (Congress) नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) म्हणाले, १९९८ मध्ये रणजीत देशमुख (Ranjeet Deshmukh) प्रदेशाध्यक्ष होते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे उमेदवार राम प्रधान होते. क्रॉस व्होटींगमुळे त्यांचा पराभव झाला. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना व्हायची होती. शरद पवार कॉंग्रेसमध्येच होते. तेव्हा झालेल्या क्रॉस व्होटींसाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांना श्रेष्ठींकडून राजीनामा मागण्यात आला होता आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तो दिलाही होता.(Ashish Deshmukh News in Marathi)

कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आता क्रॉस व्होटींगची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला पाहिजे. ते तो देत नसतील, तर पक्षश्रेष्ठींनी त्यांना राजीनामा मागितला पाहिजे. तसे होत नसेल तर मोहन प्रकाश जेव्हा मुंबईला येतील, तेव्हा आम्ही नाना पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे पदाधिकारीही सोबत असणार आहेत. या विषयात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पाठपुरावा करत आहेत. याबाबतीत लवकर निर्णय न झाल्यास गोव्यामध्ये जे होऊ घातले होते, तशीच परिस्थिती महाराष्ट्रातही उद्भवण्याची शक्यता आशिष देशमुख यांनी वर्तविली आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर तात्काळ दखल घेतली न गेल्याचे परिणाम सभागृहात बहुमत चाचणीच्या वेळी देखील बघायला मिळाले. तेथे काही आमदार उशिरा पोहोचले, तर काहींनी दांडी मारली. उशिरा पोहोचलेल्या आमदारांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात हायकमांड सोनिया गांधी विविध लोकांशी चर्चा करीत आहेत. पण येथे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचे अपयश दिसत असल्याचे विदर्भ आणि मराठवाड्यातील कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

Dr. Ashish Deshmukh News, Nana Patole News, Maharashtra political news in Marathi
हिवाळी अधिवेशनात डॉ. आशिष देशमुख विदर्भासाठी मांडणार ‘हा’ मुद्दा…

बहुमत चाचणी गैरहजर राहिलेल्या नेत्यांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील नेत्यांचाही समावेश आहे. मराठवाड्यातील कॉंग्रेसचे काही नेते नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचेही सांगण्यात येते. त्यांच्यातील वादही अनेक वेळा चव्हाट्यावर आलेला आहे. त्यातच कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे पटोलेंचे वजन कमी करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही नेत्यांनी प्रयत्न चालविल्याचे सूत्र सांगतात. आत्तापासूनच नाना पटोले यांना फटाके लावण्याचे काम सुरू झाल्याचीही माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in