Congress : प्रदेश काँग्रेस कार्यकरिणीच्या बैठकीत का भडकले विजय वडेट्टीवार?

Nana Patole : निष्क्रीय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर इशारा दिला.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

MLA Vijay Wadettiwar News : कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव मांडण्यातले आणि विविध मुद्द्यांवर नेत्यांचे मार्गदशन झाले. निष्क्रीय कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गंभीर इशारा दिला. दरम्यान माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार मात्र चांगलेच भडकले. कॉग्रेमधीलच काही लोकांनावर त्यांचा निशाणा होता.

काही आपले लोक मी काँग्रेस सोडणार, अशा अफवा पसरवत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना भेटल्याचेही दाव्याने सांगत आहेत. अशा लोकांना आवरा, असे आमदार वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. हे सांगताना आपण काँग्रेस सोडणार नाही आणि फडणवीसांना भेटलोसुद्धा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत जोडो यात्रा, हात से हात जोडो उपक्रमासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कार्यकरिणीची विस्तारित बैठक आज नागपूरमध्ये घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना इशारा देऊन आता पूर्वीची काँग्रेस राहिली नसल्याचे स्पष्ट शब्दात ठाणकावून सांगितले.

कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकारिणीतील अनेक पदाधिकारी कधीच पक्ष कार्यालयात फिरलकत नाहीत, कुठल्याच कार्यक्रमात सहभागी होत नाही, जबाबदारी घेत नाही आणि स्वतःला पक्षापेक्षा मोठे समजतात. अशांची नोंद घेणे सुरू असल्याचे पटोले यांनी सांगितले. आता ही पूर्वीची काँग्रेस राहिलेली नाही. दिल्लीही बदलली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीसुद्धा बिनाकामाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची यादी पाठवण्यास सांगितले आहे, असे सांगून पटोले यांनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना यावेळी इशारा दिला. प्रदेशची कार्यकारिणी जंबो आहे. प्रदेश प्रतिनिधी म्हणून काही नेत्यांची नियुक्ती केली. जिल्ह्यातील नेत्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना आपली चूक झाल्याचे यावेळी पटोले यांनी मान्य केले.

Vijay Wadettiwar
Wadettiwar : ..तर ती आनंद भेट ठरली असती, असं का म्हणाले आमदार विजय वडेट्टीवार ?

जिचकारांची नाराजी..

बैठकीत नरेंद्र जिचकार यांनी सर्वाधिक सदस्य नोंदणी आम्ही केली. मात्र प्रदेश प्रतिनिधी म्हणून भलत्याच लोकांना पाठविले, असे सांगून विकास ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. महिला प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यास अनेकांनी नकार दिल्याचे सांगून खंत व्यक्त केली. एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने आम्हाला कोणी विचारत नाही, कार्यक्रमांची माहिती देत नाही, जबाबदारीसुद्धा दिली जात नसल्याचे सांगून नाराजी दर्शविली. एका महिला पदाधिकाऱ्याने जे आमच्या विरोधात लढले, बंडखोरी केली त्यांनाच कार्यकारिणीत घेतले, कारावाई सोडा तेच आता आमदार, खासदारांच्या शेजारी खुर्च्या टाकून बसतात, याकडे लक्ष वेधले. अशांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com