Ajit Pawar असं का म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नाही...

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचे उमेदवार अद्यापही घोषित झालेले नाहीत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar News : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विदर्भातील अमरावती आणि नागपूर या दोन जिल्ह्यांवर राजकीय पक्षांचे बारीक लक्ष असणार आहे.

विदर्भातील अमरावती (Amravati) पदवीधर आणि नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अद्यापही घोषित झालेले नाहीत. अमरावतीमध्ये भाजपकडून (BJP) रणजीत पाटील यांच्याच नावावर पुन्हा शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. पण नागपुरात भाजपने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. येथे भाजपकडून कोण? नागो गाणार की आणखी कुणी, यावर खल सुरू आहे. पण नागपूर पदवीधर मतदारसंघाचा अनुभव लक्षात घेता, भाजप येथे धोका पत्करणार नाही, असं दिसतंय. कारण शिक्षक भारतीने गाणार यांच्याच नावाचा प्रस्ताव पाठविला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा त्यांच्या नावाचा विचार करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विक्रम काळे आणि कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये बाळाराम पाटील यांना उमेदवारी कायम असल्याचे आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत एका उत्तरात सांगितले. अमरावती पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या बाबतीत त्यांना विचारले असता, या दोन जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये अद्याप एकवाक्यता झाली नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान शिवसेनेच्या शिक्षक सेनेने उमेदवाराची घोषणा केली असली तरी ती पक्षाची भूमिका नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महाविकास आघाडी ऐन वेळेपर्यंत भाजपचा उमेदवार कोण, याची प्रतीक्षा करीत असल्याची माहिती आहे.

Ajit Pawar
‘शिक्षक`मध्ये ‘पदवीधर’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपचा सावध पवित्रा

निवडणूक जाहीर झाल्यामुळे अमरावती आणि नागपूरमध्ये कोण बाजी मारणार? हे निवडणूक पार पडल्यानंतरच समोर येणार आहे. पण या निवडणुकीसाठी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यामध्ये आता सामना पाहायला मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच आता सर्वच पक्षात हालचाली गतिमान झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in