अजित पवार अधिवेशन सोडून का गेले? अमोल मिटकरींनी सांगितलं खरंं कारण...

Ajit Pawar| Amol Mitkari| अजित पवार अचानक स्टेजवरुन निघुन गेल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
 Amol Mitkari
Amol Mitkari

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) अचानक स्टेजवरुन निघून गेले. यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र या घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

''अजित पवार नाराज नाहीत. अधिवेशन सुरु असताना त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते उठून बाहेर गेले आणि काही मिनीटातच ते परत आले. अजित पवार सकाळपासून तेथे उपस्थित होते. दुपारी २.४५ च्या सुमारास ते फ्रेश होण्यासाठी वाॅशरूमकडे गेले होते. तेव्हापासून दादा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण या चर्चांमध्ये काही दम नाही. कारण मी स्वतः तेथे उपस्थित होतो. असे स्पष्टीकरण त्यांनी सरकारनामाशी बोलताना दिले.

राष्ट्रवादीमध्ये गटबाजी असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात होत असतात, असा सवाल त्यांना विचारला असता मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादीत कोणतीह गटबाजी नाही, विरोधी पक्षाचं कामच आहे चर्चा करण्याचे ते तेच करत असतात. राष्ट्रवादी हा परिवार आहे त्यामुळे त्यात गटतट असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

औरंगाबाद येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी २५० रुपये रोजाने माणसे जमवली गेली. यावर बोलताना मिटकरी म्हणाले की, गेल्या वेळी मंत्री अब्दुस सत्तार यांच्या सभेसाठी फक्त ११० लोक जमले होते.हा पुर्ण फ्लॉपशो होता. यावेळी तसे काही होऊ नये म्हणून यावेळी २५० रुपये रोजाने माणसे सभेसाठी बोलवली गेली. पण जर हे सत्य असेल तर शिंदे सरकारचं भविष्य चांगले नाही, असे सूचक वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले आहे.

राष्ट्रीय अधिवेशनात हरियाणा, पंजाब, दिल्लीतूनही अनेक मंत्री, मोठी मंडळी आली होती. राष्ट्रीय स्तरावरचं अधिवेशन होतं म्हणजे बाहेरुन आलेल्या लोकांना प्राधान्य द्यायला हवं अशी साधी भावना त्यांच्य मनात होती. राज्यात तर आपण बोलतोच आहोत. असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान मुंंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिले. दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. पण मी अधिवेशनातून उठून गेलो म्हणून माध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला. राष्ट्रीय अधिवेशन असल्याने मी बोललो नाही. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून ते आधी बोलले. असे स्पष्टीकरण राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात व्यासपिठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण आधी सुरु झाले आणि त्यांचे भाषण सुरु होताच अजित पवार उठून गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण या सर्व घडामोडींवर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले आहे. ''मी नाराज नाही आणि मला बोलण्यापासूनही कोणी अडवलं नव्हतं. राज्यपातळीवर काही सभा, अधिवेशन असेल तर मी बोलतो, पण राष्ट्रीय पातळीवर बोलत नाही. मीच नाही तर वेळे अभावी तिथे आलेले अनेक जण बोलू शकले नाहीत. असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in