Ranjeet Patil यांच्यासोबत असलेले भाजपचे बडे नेते गाणारांसोबत का नाहीत?

BJP : भाजपचे बडे नेते उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Nago Ganar, BJP
Nago Ganar, BJPSarkarnama

Nagpur Teachers Constituency Election : अमरावती (Amravati) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्यातील भाजपचे बडे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे स्वतः जातीने हजर होते. येवढेच नव्हे तर अमरावतीमधील दसरा मैदानावर त्यांनी पदवीधरांच्या जाहीर सभेलाही मार्गदर्शन केले. पण हे बडे नेते नागपुरात नागो गाणार यांचा उमेदवारी अर्ज भरताना नव्हते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे आज नागपुरात (Nagpur) नसण्याची एक नाही तर १० कारणे सांगितली जातील. पण अमरावतीमध्ये शक्ती प्रदर्शन करणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्यांनी नागपूरमध्ये नागोराव गाणार यांच्यासोबत येण्याचे टाळले, हीच चर्चा आज दिवसभर नागपुरात रंगली. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष, आमदार प्रवीण दटके हे नेते उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याविषयी वेगवेगळे तर्कही लावले जात आहेत.

अमरावती पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रणजीत पाटील यांचा उमेदवारी दाखल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे जातीने हजर होते. मात्र नागपूरमध्ये आज दोघेही फिरकले नाही. बावनकुळे नागपूरमध्ये होते. सकाळीच ते रवाना झाले. देवेंद्र फडणवीस मुंबईत आहेत. दटके हे शहरात नसल्याने आले नाही, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. गाणार यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी खासदार सुनील मेंढे, आमदार मोहन मते, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार अनिल सोले, गिरीश व्यास, आमदार डॉ. परिणय फुके, मल्लिकार्जुन रेड्डी, अर्चना डेहनकर, डॉ. उपेंद्र कोठेकर, डॉ.कल्पना पांडे, संदीप जोशी आदी उपस्थित होते.

Nago Ganar, BJP
Graduate Constituency Election : नाशिकमधील चित्र स्पष्ट होतेय, सत्यजित तांबेच्या उमेदवारीवर बावनकुळे स्पष्टच बोलले..

काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ?

महाविकास आघाडीने शिवसेनेचे गंगाधर नाकाडे यांना उमेदवार घोषित केल्याने काँग्रेस नेते चांगलेच नाराज आहेत. आज सकाळी काही नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली. सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. पटोले यांनीसुद्धा अद्याप वेळ गेलेली नाही, असे सांगून उमेदवार बदलण्याचे संकेत दिले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपण आघाडीचे नव्हे तर संघटनेचे काम करू असे सांगितल्याने बंडखोरी होणार असल्याचे स्पष्ट दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com