Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गात नेमकी कोणाची 'समृद्धी' : काँग्रेस नेत्याने भाजपला डिवचलं!

Samruddhi Mahamarg : विदर्भातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ.
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSarkarnama

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन झालेल्या समृद्धी महामार्गात कुणाकुणाची 'समृद्धी' झाली? असा सवाल विचारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. प्रत्यक्षपणे कुणाच्याही नावाचा उल्लेख न करता पटोलेंनी काही नेते व अधिकाऱ्यांची या महामार्गातून ‘समृद्धी’ झाली असल्याचा जाहीर आरोप, नाना पटोले यांनी अकोला येथे एका कार्यक्रमात केला.

Samruddhi Mahamarg
Pandharpur Corridor संदर्भात अफवा पसरविणाऱ्यांना फडणवीसांनी हात जोडून केली विनंती; म्हणाले ‘मंदिरं अन मठ...’

भाजप सत्तेच्या गुर्मीत आहे, हे आता लोकांनाही लक्षात यायला लागलंय., याचे भोग भाजपला यापुढे भोगावं लागणारच आहे, असे नाना पटोले म्हणाले. पटोले हे विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अकोल्यात ते बोलत होते. ते म्हणाले पंतप्रधान मोदी यांच्याकडून विदर्भातील लोकांना फार मोठी अपेक्षा होती. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा झाला नाही. आजच्या मोदींच्या दौऱ्यावर फार मोठा खर्च करण्यात आला. यात वेळही वाया गेला. पंतप्रधानांचा दौरा जनतेला वेठीस धरणारा होता, असेही पटोले म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज कुणबी होते :

कुणबी समाजाने महाराष्ट्र राज्याला नेतृत्व दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने कुणबी होते, असेही प्रतिपादन नाना पटोले यांनी अकोला येथे आयोजित कुणबी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात केले. जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील कुणबी समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये माध्यमांशी ते बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

Samruddhi Mahamarg
Jalgaon Dudh sangh : खडसेंचा गंभीर आरोप ; महाजन, पाटलांनी खोक्यांचा वापर करून निवडणूक जिंकली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य कसे असावे, याचे राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. कुणबी समाज हा अन्नदाता आहे, देशाचा पोशिंदा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून काम करण्याचा माझा प्रयत्न असतो, असेही नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com