Nagpur: नागपूरचे पालकमंत्री कोण? चंद्रशेखर बावनकुळे की प्रवीण दटके ?

२०१४ ते २०१९ मध्ये पालकमंत्री राहून चुकलेले आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Chandrashekhar Bawankule News, Pravin Datke News, Nagpur News
Chandrashekhar Bawankule News, Pravin Datke News, Nagpur NewsSarkarnama

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे अशा अभूतपूर्व घडामोडी काल सायंकाळी घडल्या. सामान्य जनतेसह राजकीय जाणकारही बुचकळ्यात पडले. कालच्या धक्क्यांमधून सावरल्यानंतर आता नागपूरकरांना प्रश्‍न पडला आहे की, आपले पालकमंत्री कोण? भाजप कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय मंडळी याबाबत अंदाज, आराखडे आखत असल्याचे दिसते. (Nagpur Latest Marathi News)

नागपूर (Nagpur) जिल्ह्याचा पालकमंत्री कोण, असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्याऐवजी पालकमंत्री करायचा झाल्यास आणखी एखाद्या आमदाराला कॅबिनेट मंत्री करावे लागणार आहे आणि यामध्ये सध्यातरी २०१४ ते २०१९ मध्ये पालकमंत्री राहून चुकलेले आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापाठोपाठ भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके (Pravin Datke) यांच्याही नावावर विचार सुरू असल्याची माहिती आहे.

शिवसेनचे बंड, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, हे जवळजवळ निश्चित झाले होते. भाजपने जल्लोशाची तयारीसुद्धा केली होती. तसे संदेश मीडियाला पाठवण्यात आले होते. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रस्तावात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपला पाठिंबा द्यावा आणि फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे असे म्हटले होते. शिंदे हेसुद्धा शेवटपर्यंत आमचे नेते फडणवीस असल्याचे सांगत होते. मात्र राज्यपालांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनीच एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री राहतील, असे जाहीर करून सर्वांना धक्का दिला.

आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र पुन्हा एकदा ट्‍विस्ट आले. फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे उत्साहात असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. शहरातील जल्लोशाचे कार्यक्रम स्थगित करण्यात आले. आता फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने नागपूर जिल्ह्यातील कुठल्या नेत्याचा समावेश मंत्रिमंडळात होतो, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. फडणवीस पालकमंत्रीपद स्वीकारणार नाही, असे दिसते. त्यांच्याशिवाय दुसरा कॅबिनेट मंत्री नागपूरमधून झाला नाही, तर इतर जिल्ह्याच्या मंत्र्यांकडे नागपूरची जबाबदारी सोपवावी लागेल, असं दिसतंय.

Chandrashekhar Bawankule News, Pravin Datke News, Nagpur News
बावनकुळे प्रवाहात आल्यावरच फळफळणार भाजपचे भाग्य, ‘या’ सरपंचाचं भाकीत खरं ठरतंय?

आगामी नागपूर महापालिकेची निवडणूक लक्षात घेता पालकमंत्र्याची भूमिका महत्त्वाची राहील. त्यामुळे एकतर फडणवीस अन्यथा त्यांच्या अत्यंत विश्वासू आमदाराला कॅबिनेटमंत्री करून पालकमंत्र्यांची जबाबदारी सोपविली जाईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पालकमंत्र्यांच्या स्पर्धेत चंद्रशेखर बावनकुळे किंवा प्रवीण दटके यांची नावे आघाडीवर असल्याचे कळते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com