दसरा मेळावा कुणी हायजॅक करू शकत नाही; आदित्य ठाकरेंनी ठणकावून सांगितलं

Aditya Thackeray| DaSara Melava| दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज करुनही तो कुणीही स्वीकारला नाही
Aditya Thackeray|
Aditya Thackeray|

नागपूर : दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज करुनही तो कुणीही स्वीकारला नाही. राज्य सरकारकडून दडपशाही सुरु आहे. रितसर परवानही मागूनही त्यांनी परवानगी दिली नाही. असे स्पष्टीकरण युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिल आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार, शिवाजी पार्कवरच शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो आणि याहीवेळी तिथेच होणार, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नागपूरमध्ये विरोधकांना ठणकावून सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेतील (Shivsena) संघर्ष टोला गेला आहे. शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करुन ठाकरे सरकार पाडले. त्यानंतर शिवसेनेवर दावा सांगितला. त्याचा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला आहे. त्यातच आता शिवसेनेची अनेक वर्षांची परंपरा असलेल्या शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापले आहे.

Aditya Thackeray|
शिवतीर्थावरच उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार; पेडणेकरांनी ठणकावले

''दसरा मेळावा हा शिवसेनेचाच असतो हे संपूर्ण महाराष्‍ट्राला माहिती आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा कुणी हायजॅक करू शकत नाही. गद्दारांना निमित्त पाहिजे असतं आणि ते तेच शोधत असतात. सत्ताधारी पक्षाला आपण कधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बघितलं आहे का, पण परवा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं सत्ताधारी पक्ष निर्लज्जपणे विधानभवनाच्या पायऱ्यावर होता.

राज्यभरात आमच्या शिव संवाद यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हे पाहून खोकेवाले सरकार हादरले आहे. आता हे खोके सरकार किती दिवस टिकणार हे माहिती नाही. त्यामुळे खरी कुणाची हे महाराष्ट्रातील तमाम जनतेला माहिती आहे. राज्यातली जनताही आमच्या सोबत आहे, गद्दारांसोबत नाही. शिवसेनेने आपली कोणतीही भूमिका सोडली नाही आणि सोडणारही नाही. ज्यांना जायचं होतं ते गेले, आणी ज्यांना आमचं हिंदुत्व मान्य असेल ते सोबत येतील, असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com