जेथे विचारांचं सोनं लुटलं जायचं, तेथे काल मुख्यमंत्र्यांनी फक्त गरळ ओकली…

शेतकऱ्यांशी संवाद करून दाखवा, असे आव्हान फडणवीस Devendra Fadanvis यांनी महाविकास आघाडी सरकारला देताना मुख्यमंत्र्यांनी Uddhav Thackeray काल केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
Devendra Fadanvis and Uddhav Thackeray
Devendra Fadanvis and Uddhav ThackeraySarkarnama

नागपूर : सत्तेमध्ये असल्याने एका गोष्टीचे मुख्यमंत्र्यांना विस्मरण झाले की, जनतेने भाजपला नाकारले नाही. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला नापास केले आणि शिवसेनेला वरपास केले. वरपास झाल्यावर जनतेच्या मतांशी बेईमानी करून ते सत्तेवर आले. खरं तर बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जायचं. पण काल आम्ही तेथे केवळ गरळ ओकताना मुख्यमंत्र्यांना बघितलं, असे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या आरोपांना दिले.

सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा... असे ते दरवेळी म्हणतात ना... ते पडेलही, ज्यावेळी पडेल, तेव्हा माहितीही पडणार नाही. पण सध्या आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही. आम्हाला जनतेच्या प्रश्‍नांमध्ये इंटरेस्ट आहे. ते म्हणतात सरकार पाडून दाखवा, अन् आम्ही त्यांना म्हणतोय की, काम करून दाखवा, जनतेचे प्रश्‍न सोडवून दाखवा, त्यांना दिलासा देऊन दाखवा, शेतकऱ्यांशी संवाद करून दाखवा, असे आव्हान फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला देताना मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

काल दसरा महोत्सवानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जोरदार भाषण झाले. या भाषणात त्यांनी मोठ्या खुबीने महाविकास आघाडीतील सहकारी दोन पक्षांचे नावे घेणे टाळले, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केले. त्या उत्तर देताना फडणवीस आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, त्यांचा अर्धा पक्ष उपऱ्यांच्या भरवशावर उभा आहे. अर्धेअधिक उमेदवार आम्ही त्यांना दिले आणि सरकार मिळाले आले तर ते नीट चालवून दाखवा, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

Devendra Fadanvis and Uddhav Thackeray
आजही मला मुख्यमंत्री असल्याचे वाटते : देवेंद्र फडणवीस

ड्रग्जच्या विरोधात एक मोठी लढाई लढली जात आहे. याचा एक मुख्यमंत्री म्हणून त्यांना आनंद व्हायला पाहीजे. पण तसे होताना दिसत नाही. मुंबईमध्ये ड्रग्जचा विळखा हळूहळू घट्ट होत चालला आहे. अशात आमच्या युवा पिढीला या विळख्यातून सोडवायचे असेल, तर ड्रग्जच्या विरुद्ध लढाई लढावीच लागेल. पण राज्य सरकार या लढाईमध्ये सहभागी आहे किंवा होईल, असे सध्यातरी वाटत नाही. कारण हे सरकार ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांच्या बाजूने आहे की, ड्रग्ज घेणाऱ्यांच्या बाजूने, की ड्रग्जविरोधात लढणाऱ्यांच्या बाजूने आहे, हेच कळत नाहीये, असेही फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com