राष्ट्रवादीमध्ये चाललंय तरी काय? कारेमोरेनंतर आणखी एका नेत्यावर गुन्हा दाखल...

भंडारा (Bhandara) शहरातील राष्ट्रवादीच्या (NCP) पुन्हा एका नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Raju Karemore and Jayant Wairagade Bhandara NCP
Raju Karemore and Jayant Wairagade Bhandara NCPSarkarnama

भंडारा : सुरू झालेले आलेले नवीन वर्ष भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसाठी चांगले ठरले नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मोहाडीचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांचे पोलिसांना अश्लील शिवीगाळ प्रकरण शांत होत नाही, तोच भंडारा शहरातील राष्ट्रवादीच्या (NCP) पुन्हा एका नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी हे नेते दुसरे तिसरे कुणी नसून भंडारा (Bhandara) अर्बन को-आप बॅंक लि. चे विद्यमान उपाध्यक्ष ॲड. जयंत वैरागडे आहेत. सोबत त्यांचे भाऊ हेमंत वैरागडे व श्रीकांत वैरागडे यांच्यावर सुद्धा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर एका प्रकरणात मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला आहे. बुधवारी वैरागडे बंधूंनी जबलपूर कोर्टात हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यांच्या याचिकेनंतर संबंधित प्रकार उघडकीस आला.

राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्या अत्यंत निकटतम समजले जाणारे ॲड. जयंत वैरागडे हे सुद्धा भंडारा अर्बन को-आप बॅंकेचे उपाध्यक्ष असून विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे संचालक आहे. त्यांच्यासह त्यांचे दोन्ही भाऊ हेमंत वैरागडे व डॉ. श्रीकांत वैरागडे यांच्यावर जबलपूर महिला पोलिस स्टेशन मध्ये 23 जानेवारी 2022 ला एका महिलेच्या तक्रारी वरुन भादंवि 354 A, 294, 417, 34, 506 नुसार विनयभंग, अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल होताच तिन्ही वैरागडे बंधूंनी जबलपूर न्यायालयात 2 फेब्रुवारीला धाव घेत आपल्यावरील गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे.

Raju Karemore and Jayant Wairagade Bhandara NCP
भंडारा जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी पोहोचली चरम सीमेवर...

प्रतिवादी म्हणून त्यांनी तक्रारदार महिला व जबलपूर महिला पोलिस स्टेशन यांना प्रतिवादी ठेवले आहे. ह्या संपूर्ण प्रकाराची सुनावणी जबलपूर कोर्टाचे मुख्य न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांच्या समोर होणार असून 8 फेब्रुवारीला याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे रद्द होतात की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीला मोहाडीचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी आपल्या व्यापारी मित्राला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा जाब विचारताना पोलिसांना अश्लील शिवीगाळ करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या प्रकरणी भंडारा पोलिसांनी कारेमोरे यांना अटक केल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना 12 तासाची तुरुंगाची हवा खावी लागली होती.

अखेर अंतरिम जामिनावर त्यांची तात्पुरती सुटका झाली आहे. अजून ते प्रकरण न्यायालयीन आहे. मोहाडीचे आमदार अश्लील शिवीगाळ प्रकरण हे संपूर्ण देशात गाजले असताना आता पुन्हा भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते ॲड. जयंत वैरागडे व त्यांच्या दोन्ही भावावर जबलपूर महिला पोलिसांनी कलम 354 A नुसार विनयभंगाचा गुन्हा नोंद दाखल केल्याने आता पुन्हा एकदा भंडारा राष्ट्रवादी पक्षाचे नेते चर्चेत आले आहेत. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात राष्ट्रवादी दोन मोठ्या नेत्यांवर पोलिस कारवाई होणे, ही बाब राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अडणीची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com