Wadettiwar : मुनगंटीवारांच्या ‘त्या' निर्णयाचे स्वागत; पण गेलेले उद्योग कोण परत आणणार ?

राज्यातील तरुणांना आता हे कळून चुकले आहे. त्यामुळे महाराजांच्या जगदंबा तलवारीसोबत त्यांनी महाराष्ट्रात उद्योगही आणावे. तेव्हाच लोक त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवतील, असे आमदार वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.
Vijay Wadettiwar and Sudhir Mungantiwar
Vijay Wadettiwar and Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहे. गेली २१ वर्षे जे कुणाला जमले नाही, त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, याचाही मनस्वी आनंद आहे. परंतु महाराष्ट्राच्या बाहेर उद्योग गेले, त्यामुळे हजारो बेरोजगारांचे नुकसान झाले. राज्याचे प्रचंड नुकसान झाले. आता त्यांनी महाराजांच्या तलवारीसोबत राज्याबाहेर गेलेले उद्योगही परत आणा, असा सल्ला माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला.

शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) तलवार परत आणून राज्यातील जनतेची अस्मिता जपली जाणार आहेच. पण सोबतच राज्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देणारे उद्योग महाराष्ट्रात (Maharashtra) आणावे लागणार आहेत. पण त्याकडे लक्ष न देता तलवार परत आणण्यासारखे उद्योग करून सत्ताधारी बेरोजगारांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार सत्ताधारी करीत आहेत. राज्यातील तरुणांना आता हे कळून चुकले आहे. त्यामुळे महाराजांच्या जगदंबा तलवारीसोबत त्यांनी महाराष्ट्रात उद्योगही आणावे. तेव्हाच लोक त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवतील, असे आमदार वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Vijay Wadettiwar and Sudhir Mungantiwar
Wadettiwar : ..तर ती आनंद भेट ठरली असती, असं का म्हणाले आमदार विजय वडेट्टीवार ?

केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी जगदंबा तलवार परत आणू नये, तर तलवारीसोबतच बेरोजगारांच्या हाताला रोजगार देणारे उद्योगही आणून समुद्धीही आणावी, अशी मागणी त्यांनी केली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणण्याची घोषणा केल्यानंतर माजी मंत्री कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला चिमटे काढले आहेत. तलवारी इतकाच महत्वाचा प्रश्‍न येथील बेरोजगारांचा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावर आता मंत्री मुनगंटीवार यांच्याकडून काय उत्तर येते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in