ईडीची पुडी करून खिशात ठेवायची ताकद आमच्यात आहे...

ईडीच्या नोटीस, ED Notice ईडीच्या धाडी आणि तिचा त्रास शिवसेना Shiv Sena काही जुमानत नाही. आम्ही भाजपला BJP त्यांची जागा दाखवून दिली आहे.
Kishor Tiwari
Kishor TiwariSarkarnama

अकोला : भाजपने ईडीच्या माध्यमातून कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही त्याला जुमानणार नाही. आम्ही भाजपला त्यांची जागा यापूर्वीही दाखवून दिली आहे, ती आता २०२४ मध्येही दाखवून देऊ. ईडीची पुडी बांधून खिशात ठेवायची ताकद आमच्यात आहे, असा घणाघात स्व. वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी येथे म्हणाले.

ईडीच्या नोटीस, ईडीच्या धाडी आणि तिचा त्रास शिवसेना काही जुमानत नाही. आम्ही भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आहे. २०२४ मध्येही अजून त्यांना दाखवू देऊ. त्यांनी या चौकशीत सर्वच नेते ठेवले तरीही काही होणार नाही. ईडीची पुडी बांधून खिशात टाकायची आमची ताकद आहे, असे म्हणत तिवारी यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्ष आता वेगळे वळण घेऊ लागला आहे. भाजप सेनेच्या नेत्यांवर जसजसा ईडी आणि सीबीआयचा पाश आवळत आहे, तसतसे सेनेचे नेते त्याला प्रत्युत्तर देऊ लागले आहेत.

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात तिवारी बैठक घेण्यासाठी आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त वक्तव्य केले. पुढे ते म्हणाले, अशा ईडीच्या नोटीसला कोणीही जुमानत नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा हैदोस सुरू आहे. ही एक नौटंकी आहे. या नौटंकीला आम्ही घाबरू, अशी परिस्थिती अजिबात नाही आहे, असेही ते म्हणाले. लोकांनाही कळले आहे की, आजपर्यंत फक्त शिवसेनेचे नेते त्यांना दिसत आहेत. आम्हाला नोटीस देत आहेत. जे जे भाजपच्या विरोधात बोलत आहेत, त्यांना नोटीस देण्याचे काम सुरू आहे. भाजपचा कोणी नेता त्यांना दिसत नाही का, असा सवालही त्यांनी केला.

Kishor Tiwari
"मोदी-शहा भक्तां'नी माझा अपमान करू नये - किशोर तिवारी

नितीन गडकरी यांनाही लगावला टोला

भाजपचे जे गड्डेकरी नेते आहेत, त्यांना भाजपने बोलायला पाहिजे, असा टोला त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव न घेता लगावला. किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर हे बँक बुडवून एका मजूर संघटनेचे मजूर झाले आहे. याच्यावर बोलायला पाहिजे. हे सगळे काम द्वेषातून होत आहेत. जर एखादा माणूस द्वेषातून काम करत असेल तर तो त्याच्या मनातून ऐकतो डोक्याचे ऐकत नाही. केंद्र सरकारनेही हे सिरियसली घेऊ नये. शिवसेना जर भाजपसोबत नसली तरी येथे भाजपचे खातेही उघडणार नाही, अशी परिस्थिती आहे, असाही आरोप राज्यमंत्री दर्जा असलेले किशोर तिवारी यांनी आरोप केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com