अनिल देशमुखांच्या अटकेचा आम्हाला फायदा घ्यायचा नाही, कारण…

अनिल देशमुखांच्या Anil Deshmukh अटकेचा आम्हाला मुळीच फायदा घ्यायचा नाही. कारण त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने आमचा पक्ष विदर्भात मजबूत आहे, असेही ते Chandrashekhar Bawankule म्हणाले.
Chandrashekhar Bawankule and Anil Deshmukh
Chandrashekhar Bawankule and Anil DeshmukhSarkarnama

नागपूर : अनिल देशमुख यांच्या या प्रकरणामुळे विदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस डॅमेज झाली की वाढली, याबद्दल मला काही सांगता येणार नाही. पण एक मात्र खरे की, अनिल देशमुखांनी ज्या काटोल विधानसभा मतदारसंघातून मते घेतली, तेथील लोक आता ओरडत आहेत. आमचे आमदार कुठे आहेत, आम्हाला त्यांच्यासोबत रोजच काम पडते. त्यामुळे त्यांनी एक तर आमच्या समोर यावे, नाही तर राजीनामा द्यावा. आम्हाला आमदाराची गरज आहे, असे काटोलचे लोक म्हणत असल्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस आज म्‍हणाले.

आमच्या आमदारांना शोधून आणा, आम्ही त्यांना मते दिली आहे, त्यांच्यासोबत आम्हाला रोजच काम पडते, अतिवृष्टीने नुकसान झाले, भरपाई मिळाली नाही, पीक कर्ज मिळाले नाही, सरकारची एकही योजना काटोल-नरखेडच्या जनतेला मिळाली नाही. काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्यासाठी त्यांनी मते घेतली होती. त्यामुळे आता त्यांनी जनतेच्या सेवेत यावे, असेही लोक म्हणत असल्याचे बावनकुळे म्हणाले. अनिल देशमुखांच्या अटकेचा आम्हाला मुळीच फायदा घ्यायचा नाही. कारण त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने आमचा पक्ष विदर्भात मजबूत आहे, असेही ते म्हणाले.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जर कोणताही गैरव्यवहार केला होता, तर त्यांनी पहिल्या दिवशीच चौकशीला सामोरे जायला पाहिजे होते. ते गेले नाही, परिणामी संशय वाढला आणि सीबीआयनेही चौकशी केली, ईडीने चौकशी केली, त्यांच्या मालमत्तेवर छापे पडले. काल १२ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीअंती सत्य आढळले असेल आणि ईडीकडे योग्य पुरावे असतील, तेव्हाच त्यांना अटक करण्यात आली, असे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज येथे म्हणाले.

ज्याने अनिल देशमुखांवर आरोप केले, तो परमबीर सिंह फरार आहे. त्याबद्दल भाजपचा एकही नेता बोलत नाहीये, असे विचारले असता बावनकुळे म्हणाले, हे काम राज्य सरकारचे आहे. तो कुठे फरार झाला, हे शोधणे त्यांचे काम आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्ही त्यांना काय सांगणार? राज्य सरकारचा एक मोठा पोलिस अधिकारी गायब झाला, तर हे त्यांनीच शोधले पाहिजे. कॉंग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे की, ते बेल्जिअमला गेले आहेत. त्यांना जर येवढी माहिती परमबीर सिंह यांची असेल, तर त्यांनी त्याचा पत्ता सरकारला सांगावा. ते कुठे कुठे फिरले, हे राज्य सरकारला माहिती नव्हते का? ही सर्वस्वी राज्य सरकारची जबाबदारी आहे.

Chandrashekhar Bawankule and Anil Deshmukh
बावनकुळे संतापले; म्हणाले... तर आम्ही सरकारला सोडणार नाही !

भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच मागणी केली आहे की, १०० कोटी रुपये वसुलीच्या प्रकरणात जे जे आरोपी आहेत, त्या सर्वांना अटक करा. ही मागणी राज्य सरकारने ऐकली नाही, त्यांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली नाही. ईडी आणि सीबीआयने चौकशी केल्यानंतर त्यांच्या अहवालात काय आहे, हे कुणालाही माहिती होत नाही. तसे ते माहिती होऊही नये. त्यांच्या तपासात ज्यांची नावे पुढे येतील, त्यांना अटक केली जाईल. या प्रकरणात अनिल देशमुखांचे पीएंना अटक झाली. त्यानंतर सचिन वाझेला अटक झाली आता खुद्द अनिल देशमुखांना अटक झाली. आता अनिल देशमुख कुणा-कुणाची नावे घेतात, त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com