शरद पवारांच्या त्या वक्तव्याला आम्ही महत्व देत नाही : नाना पटोलेंची तिखट प्रतिक्रिया…

कॉंग्रेस Congress हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जे नेते होते, ते Sharad Pawar पक्षातून गेले. आमच्या पक्षात काय चाललंय, हे आम्हाला Nana Patole माहिती आहे.
शरद पवारांच्या त्या वक्तव्याला आम्ही महत्व देत नाही : नाना पटोलेंची तिखट प्रतिक्रिया…
Nana Patole and Sharad Pawar.Sarkarnama

भंडारा : मला वाटलं होतं की, कॉंग्रेस पक्षामध्ये सर्व निर्णय दिल्लीत हायकमांड घेतात, पण हल्ली कॉंग्रेसचे निर्णय भंडारा, गोंदिया आणि चंद्रपुरातील नेते घेत आहेत. हे बघून आश्‍चर्य वाटतं, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल गडचिरोली जिल्ह्याच्या दोऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलले. त्यावर शरद पवारांना आम्ही महत्व देत नाही, अशी तिखट प्रतिक्रिया नाना पटोलेंनी आज दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भात एकच दुकान आहे आणि तेसुद्धा लवकरच बंद पडेल. कारण एक दुकान बंद पडायला, असा कितीसा वेळ लागतो, अशा शब्दांत डिवचणारे विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलडाण्यात केले होते. त्यावर नाना पटोले भाजप पक्षाकडून खासदार झाले होते. भाजपच्या संस्कृतीत ते राहिलेले आहेत. त्या संस्कृतीनुसार, त्यांनी तसे विधान केले असावे. पण कॉंग्रेस असो की राष्ट्रवादी, आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारांवर चालणारे पक्ष आहोत. नाना तसे बोलू शकतात, पण आम्ही नाही बोलू शकत. कारण आम्हाला आमची संघटना तर चालवायचीच आहे, पण सरकारही चालवायचे आहे, असे पवार म्हणाले होते.

येवढेच सांगून थांबतील ते पवार कसले? पटोलेंनी ‘दुकान बंद’ म्हणत डिवचल्यानंतर एकेकाळी पटोलेंचे नागपुरातील बजाजनगर येथे उठबस असलेले जुने दुकान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी परवा बंद केले आणि पटोलेंना काय सांगायचे तो संदेश दिला. या घडामोडींनंतर नाना पटोले यांना विचारणा केली असता, आम्ही शरद पवारांना महत्व देत नाही, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी आज दिली.

साकोली तालुक्यातील त्यांच्या सुकळी या गावात निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. पटोले म्हणाले, आमचं हायकमांडच आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. हायकमांड जे आदेश देतात, ते आम्हाला माहिती आहेत. आमच्या घरात काय सुरू आहे, ते बाहेरच्या लोकांना काय माहिती असणार? त्यांच्या काळातलं त्यांना जे माहिती असेल, त्याच्या आधारावर ते बोलले असतील. आता कॉंग्रेसमध्ये खूप बदल झाले आहेत. कॉंग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जे नेते होते, ते पक्षातून गेले. आमच्या पक्षात काय चाललंय, हे आम्हाला माहिती आहे. बाहेरच्यांना ते कळू शकत नाही.

Nana Patole and Sharad Pawar.
पंतप्रधान मोदी हे आदिवासींना वनवासी म्हणाले : शरद पवारांची टीका

राज्यात सध्या काय चाललंय, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांच्या त्या मुद्याला आम्ही फार महत्व देत नाही. कॉंग्रेसने सातत्याने त्याग केलेला आहे, जनतेला माहिती आहे. त्यामुळे कुणाच्या प्रमाणपत्राची गरज आम्हाला नाही, असेही पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in