'आम्ही फिल्डवर काम करणारे लोक', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा टोला…

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सुरत, गुवाहाटी, गोवा आणि त्यानंतर मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर सभागृहात पहिल्याच दिवशी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी केली होती.
Eknath Shinde News, Uddhav Thackeray News, Devendra Fadnavis News, Political News
Eknath Shinde News, Uddhav Thackeray News, Devendra Fadnavis News, Political NewsSarkarnama

नागपूर : शिवसेनेशी बंड करून अनेक नाट्यमय व धक्कादायक घडामोडींनंतर मुख्यमंत्री बनलेले नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सुरत, गुवाहाटी, गोवा आणि त्यानंतर मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर सभागृहात पहिल्याच दिवशी त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खुमासदार शैलीत टोलेबाजी केली होती. काल विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा टोला हाणला.(Eknath Shinde latest Marathi News)

कालच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा (Devendra Fadanvis) होते. सभागृहात पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंपासून (Uddhav Thackeray) ते संजय राऊतांपर्यंत (Sanjay Raut) सर्वांनाच त्यांनी टोले हाणले होते. ‘आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, तर अनेक खस्ता खात, बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन रक्ताचे पाणी करून आम्ही शिवसेना उभी केली.’, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना जबर टोला हाणला होता. तुम्ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांचे चिरंजीव असल्यामुळे त्या पदावर आहात, असे तेव्हा त्यांचे म्हणणे असल्याची चर्चा तेव्हा झाली.(Political News in Marathi)

काल गडचिरोलीमध्ये अधिकाऱ्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करतानाही त्यांनी टोलेबाजी करण्याची संधी दवडली नाही, तर उद्धव ठाकरेंना त्यांनी टोला हाणलाच. ‘तुम्हाला काहीही लागलं तर आम्ही दोघंही (स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही फिल्डवर काम करणारे लोक आहोत’, असे ते अधिकाऱ्यांना म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जास्तीत जास्त काळ त्यांनी घरात बसूनच कारभार चालवला. मंत्रालयात येतच नाही, असा आरोप त्यांच्यावर वेळोवेळी केला केला. नेमका तोच धागा पकडत ‘आम्ही फिल्डवर काम करणारे लोक आहोत’, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना हाणला.

गडचिरोलीत मेडिकल कॉलेज नक्की होणार..

मागच्या सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना आपण गडचिरोली जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न करत होतो. पण, आता स्वत:च मुख्यमंत्री झाल्यामुळे हे प्रयत्न पूर्ण झाले असून गडचिरोलीत मेडिकल कॉलेज नक्की होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी काल गडचिरोलीच्या नियोजन भवनात केली. यावेळी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा व इतर बाबींचा आढावा घेताना त्यांनी ही घोषणा केली. या आढावा बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हाधिकारी संजय मिना, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर आदी उपस्थित होते.

Eknath Shinde News, Uddhav Thackeray News, Devendra Fadnavis News, Political News
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे शिवसेना आमदारांना नापसंत पडले?

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सुविधांची नितांत आवश्यकता आहे. विशेषत: नक्षल्यांसोबतच्या चकमकीत पोलिस जवान जखमी झाल्यास त्यांना नागपूरला हलवावे लागते. यात अनेकदा त्यांचे प्राणही जातात. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या कामाला अधिकाऱ्यांनी तातडीने लागावे. तसेच दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी योजना राबविणार असून त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. आलापल्ली-सिरोंचा महामार्ग व वनविभागाच्या परवानगीअभावी अडलेले इतर मार्गांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तत्पूर्वी त्यांनी आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी केली.

फडणवीस या सरकारचे मार्गदर्शक..

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा या नव्या शिवसेना-भाजप युतीच्या सरकारला होईल. या सरकारमध्ये ते मार्गदर्शक आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही आमच्या सरकारला आशीर्वाद आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीदरम्यान म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in