Washim District APMC Analysis : भाजपने देशमुखांमुळे राखले रिसोड, बाकी सर्वत्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच !

Anantrao Deshmukh : माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा करिश्मा रिसोडात चालला.
Anantrao Deshmukh
Anantrao DeshmukhSarkarnama

Washim Bazar Samiti Elections Results Analysis : वाशीम जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या जाहीर झालेल्या निकालात मालेगाव, मंगरुळपीर व कारंजात महाविकास आघाडीने स्पष्ट बहुमत सिद्ध केले. तर माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा करिश्मा रिसोडात चालला असून या बाजार समितीत भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. येवढेच काय ते भाजपचे यश म्हणावे लागेल.

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने पुन्हा सत्ता मिळवली आहे. १८ संचालकांपैकी महाविकास आघाडीचे १७ संचालक निवडून आले आहेत. तर भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. यामुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे.

तालुक्यातील सहकार क्षेत्रावर आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. महाविकास तर्फे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, बळीराजा मित्र मंडळ व डॉक्टर अरुण इंगोले मित्र मंडळ एक संघपणे या प्रचाराला लागले होते.

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार अमित झनक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव चोपडे, राष्‍ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय दहात्रे, गणेश उंडाळ काँग्रेसचे तालुका जगदीश बळी, सुरेशराव शिंदे, शेख गणिभाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे तालुका अध्यक्ष उद्धव गोडे, माजी पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किसनराव घुगे, वंचित बहुजन आघाडीचे संदीप सावळे आदींनी प्रचार केला होता.

Anantrao Deshmukh
Chandrapur APMC Analysis : चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेसची कामगिरी चांगली, पण कुठे-कुठे सभापतिपदासाठी रस्सीखेच !

भाजपतर्फे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन देवळे जिल्हा परिषद सदस्य श्याम बढे आदींनी प्रचार केला होता. यापूर्वीच्या संचालक मंडळात माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा गट व भाजपचे पाच संचालक होते. यावेळी त्यांचा फक्त एक संचालक निवडून आला आहे. अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती. तर आमदार अमित झनकही पूर्ण शक्तीनिशी प्रचारात उतरले होते. त्यांनी व महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सहकार क्षेत्रात पाळेमुळे रोवलेल्या महाविकास आघाडीच्या ताब्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा महाविकास आघाडीने कायम राखली आहे. (Political Short Videos)

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्व.माजी आमदार प्रकाश डहाके प्रणीत शेतकरी विकास आघाडीचा झेंडा फडकला. संचालक पदाच्या १८ जागेवर एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करून डहाकेंनी सहकार क्षेत्राचे आपणच ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले. तर खरेदी विक्री संघ निवडणुकीच्या पाठोपाठ या निवडणुकीतही माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर व आमदार राजेंद्र पाटणी यांच्या महाआघाडी पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. निकालानंतर माजी आ. स्व. प्रकाश दादा डहाके यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित संचालकांचा सई डहाके व दत्तराज डहाके, देवव्रत डहाके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Anantrao Deshmukh
Wardha District APMC Analysis : वर्धा जिल्यात बाजार समिती भाजपच्या आवाक्यापासून दूरच !

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेली निवडणूक अत्यंत अटीतटीची राहिली. भाजप व मित्र पक्षाचा निसटता विजय झाला आहे. तीन जागांसह भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने विजयाची सुरुवात केली. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीने लागोपाठ सात जागा काबीज केल्या. यामध्ये विविध मतदारसंघातील जागांचा समावेश आहे. त्यामुळे भाजप शिंदे गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या गटाने कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे. माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रवेशानंतर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच निवडणूक होती. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माजी आमदार विजयराव जाधव, शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी होत्या. मात्र यावेळी त्यांना आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने कडवी झुंज दिली.

Anantrao Deshmukh
Maregaon APMC Result : मारेगावात काॅंग्रेस-शिवसेनेने (ठाकरे) एकत्र येत केला भाजपचा पराभव !

वाशीम जिल्ह्यात भाजपला केवळ रिसोडमध्ये यश मिळाले असून, या ठिकाणी त्यांनी १० जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला आहे. मतमोजणीत सलग ७ जागा जिंकणाऱ्या महाविकासला अखेर भाजपने सेवा सहकारी संस्थेच्या ७ पैकी ६ जागा काबीज करत बहुमत प्राप्त केले.

मंगरूळपीर बाजार समितीत ठाकरेंचा बोलबाला..

मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १७ जागांवर माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी सहकार पॅनलचा एकतर्फी दणदणीत विजय झाला असून विरोधकांचा पार धुव्वा उडाला आहे. माजी मंत्री सुभाष ठाकरे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक विजय संपादन केल्यामुळे त्यांचे सक्षम नेतृत्व अधोरेखित झाले आहे.

Anantrao Deshmukh
Akola APMC Election Analysis : राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसला तोड मिळाला, वंचितचा सहकारात शिरकाव !

मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री सुभाष ठाकरे व जिल्हा परिषदेचे (ZP) अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी सहकार पॅनलने निवडणूक (Election) लढविली. यामध्ये १८ पैकी १७ जागा शेतकरी (Farmer) सहकार पॅनलने पटकावल्या तर मंगरूळपीर तालुका विकास आघाडीचा पार धुव्वा उडाला असून शेतकरी सहकार पॅनलने निवडणुकीत (APMC Election) १८ पैकी १७ जागांवर विजयश्री खेचून आणली. या निकालांवरून माजी मंत्री सुभाष ठाकरे व चंद्रकांत ठाकरे यांचे सक्षम नेतृत्व अधोरेखित झाले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com