Wadettiwar On Jalna Protest: मराठा समाज ‘जनरल डायर’ला शोधून काढेल, अन् चांगला धडा शिकवेल !

Jalna Maratha Andolan: हा संभ्रम कोणाला घातक ठरेल, ते येणाऱ्या काळात कळेल.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Nagpur Political News : जालन्यातील अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणी शरद पवारांचे नाव घेऊन संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा संभ्रम कोणाला घातक ठरेल, ते येणाऱ्या काळात कळेल. या घटनेतून मराठा समाज बोध घेईल आणि जनरल डायर कोण आहे, याचा शोध घेईल. मराठा समाज जनरल डायरला शोधून त्याला चांगलाच धडा शिकवेल, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. (Who will this confusion be harmful to, will be known in the coming time.)

आज (ता. ४) नागपुरात वडेट्टीवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जनरल डायर कोण आहे, हे मी काय सांगणार? ते मराठा समाजाला माहीत आहे किंवा ज्यांनी म्हटले जनरल डायर, त्यांना विचारा. कारण लाठीचार्ज झाला. डोकी फुटली, लोक जखमी झाले. हे पाप ती घटना घडवून आणणाऱ्यांना भोगावे लागणार आहे.

फार चौकशी करू नये तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर जे गुन्हे नोंदवले गेले ते मागे घ्यावे. स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत त्या गावातील एकही व्यक्तीवर गुन्हा नाही आणि त्यांच्यावर ३०७ सारखे गुन्हे दाखल केले आहेत. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे त्यांचे गुन्हे बिनशर्त मागे घ्यावे. त्यांच्यावर खटले चालवू नका आणि दोषींना सेवेतून बडतर्फ करा. कोणी काय केले ते व्हिडिओतून सगळे स्पष्ट दिसते आहे. चौकशीतून सगळं समोर येईल.

राहुल गांधींनी जाती-धर्मांतील दरी मिटवली..

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जार हजार किलोमीटर प्रवास करत जाती-धर्मांतील दरी मिटवली. मागच्या सहा महिन्यांत राज्यात (Maharashtra) सात दंगली झाल्या. याला जबाबदार कोण, हे कळेलच. संवाद यात्रेतून लोकांच्या वेदना जाणून घेऊ आणि लोकांना जोडू. सध्याच्या सरकारमुळे कोणताच घटक खूश नाही. संवाद यात्रेने काँग्रेसला बळकटी मिळेलच. शिवाय ही यात्रा माणसाला माणूस म्हणून जोडेल, असे वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar On Jalana Protest | "मराठा समाजाची माफी मागा" | Nagpur |

आज जालन्याला जाणार..

मी आज जालना येथे जाणार आहे. तिथे जाऊन घटनेची इत्यंभूत माहिती घेईल. हा लाठीचार्ज सरकार पुरस्कृत आणि गृहविभाग पुरस्कृत आहे. मराठा समाजाचा ठिकाठिकाणी उद्रेक दिसतोय. केवळ मतासाठी आरक्षणाची बनवाबनवी सुरू होती. ती चूक आता सरकारला महागात पडेल, असे चित्र दिसत आहे.

गृह विभाग खोटे बोलतोय की अगोदर पोलिसांवर दगडफेक झाली. जखमी पोलिसांचा झाल्याचा आकडा वाढवून सांगितला जात आहे. भिडेचा विषय होता, त्यावेळी त्यांचे समर्थन आणि पोलिसांवर कारवाई. आता मराठा समाजाला दोषी धरले जात आहे. मराठवाडा यात्रा एक आठवडा पुढे ढकलली. मराठा समाजाला शांततेने आंदोलन करण्याच आवाहन आम्ही केले आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar यांचा PM Narendra Modi यांच्यावर घणाघात | One Nation One Election

मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यापूर्वी आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. या राज्यात ओबीसी नेतृत्व एक-एक करून संपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कामठीवाले एकच राहिलेले दिसतात. त्यांचा दिवा किती दिवस जळत राहतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे नाव न घेता वडेट्टीवारांनी त्यांना टोला लगावला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in