
Maharashtra Political News : शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हे गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून लक्षात येत आहे. कितीही एक असल्याच्या बाता केल्या तरी राज्यातील जनता आता या ‘ॲडजेस्टमेंट’ सरकारला समजू लागली आहे. अशात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा ट्रिपल इंजीन सरकारवर निशाणा साधला आहे. (Vadettiwar has once again targeted the triple engine government)
आमदार विजय वडेट्टीवार जेव्हापासून विरोधी पक्षनेते झाले, तेव्हापासून ते दररोज काही ना काही मुद्द्य़ांवरून राज्य सरकारवर हल्ला चढवत असतात. आजही त्यांनी ट्विट करून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ट्रिपल इंजीन सरकारमधील इंजीनं आता एकमेकांना धक्के मारत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही बोलत नसले तरी, त्यांच्या देहबोलीतून सर्वकाही लक्षात येते आहे.
राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांवर बंधने घातली. पण पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ती बंधने उठवली. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करीत आहेत.
त्यामुळे आता यापुढे सर्व फाईल्स अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील, अशी योजना शिंदेंनी राबवली आहे. पुढील काळात तिन्ही इंजीन एकमेकांना जोरजोरात धडकायला लागतील. त्याचेच हे ‘ट्रेलर’ आहे.
काय म्हटलंय ट्विटमध्ये ?
`ट्रिपल इंजीन सरकार मधील इंजीन एकमेकांना आता धक्के मारत आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांवर बंधन घातली.. पण पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अजित पवार यांनी घातलेली बंधन हटवल्याचे वृत्त आले आहे.. यातून सरकारची नाचक्की झाली… सरकारमध्ये कोणत्याही विषयावर एक धोरण नाही, फक्त आपआपल्या पक्षाच्या नेत्यांसाठी सरकार मधील तिन्ही पक्ष राबत आहेत. …सर्वसामान्यांचे सरकार असे काम करते का?’, असे ट्विट विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज (ता. ३०) सकाळी केले आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.