Vijay Wadettiwar News: अर्थव्यवस्था खिळखिळी, त्यातही काळाबाजार खुलेआम सुरू, सरकारला धारेवर धरणार !

नोकरभरतीच्या घोषणा होतात, त्याला तारीख पे तारीख दिली जाते.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Nagpur News : राज्याची अर्थव्यवस्था पूर्णतः खिळखिळी झालेली आहे. केवळ घोषणा होत आहेत, काम होत नाहीये. घोषित केलेल्या कामांना प्रत्यक्ष पैसा मिळत नाहीये. एकूणच या राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. उद्योग बाहेर गेले त्यामुळे बेरोजगारीचे संकट आहे. सरकारचे मंत्री माध्यमांसमोर येऊन घोषणा तेवढ्या करतात, प्रत्यक्षात कृती मात्र शून्य आहे, असा घणाघात माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.

नागपुरात ‘सरकारनामा’शी बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, नोकरभरतीच्या घोषणा होतात, त्याला तारीख पे तारीख दिली जाते, निर्णय घेतले जातात, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. डीपीसीचा ७० टक्क्यांपेक्षा निधी खर्च झालेला नाही. बजेटचा निधी हे सरकार खर्च करू शकलेले नाही. सामाजिक न्याय विभागाचा निधीही खर्च झालेला नाही.

एकूणच महाराष्ट्रात गेल्या ८ महिन्यात मोठे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. माध्यमांसमोर येऊन घोषणा करायच्या, निधी दिल्याचे सांगायचे प्रत्यक्षात कृती मात्र शून्य आहे. या सरकारची एकूणच स्थिती वाईट आहे. हे सर्व विषय घेऊन या अधिवेशनात सरकारला आम्ही घेरू. त्यांना जाब विचारू. राज्यावर कर्जाचा डोंगर उभा झालेला आहे. कर्ज काढून घरं बांधायचे, हे ठीक आहे. पण कर्ज फेडायचं कसं, हा मोठा प्रश्‍न आहे.

घरकुलांचे पैसे येत नाहीत. पंतप्रधान आवास योजनेतील घरांची कामे अर्धवट पडलेली आहेत. केंद्राचा पैसा अद्याप आलेला नाही, अशा वेळी राज्य सरकारने तो भार उचलायला पाहिजे, पण राज्य सरकार लक्ष देत नाही. विकास ठप्प झालेला आहे. काही मोजक्या लोकांसाठीच सरकार चाललेलं आहे, असं दिसतंय. काहीच लोकांना अमाप निधी देण्याचं काम सुरू असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar
Wadettiwar : कुणालाही काहीही टिका करू द्या, पण ‘भारत जोडो’ ही माणूस जोडणारी यात्रा !

कोळशाचा खुला काळाबाजार सुरू आहे. ज्या कोलवॉशरीला ट्रेडींगचा परवाना नाही, पोलिसांची परवानगी नाही. अशा कोलवॉशरी रिजेक्ट कोलच्या नावाखाली उच्च दर्जाचा कोळसा खुल्या बाजारात विकत आहेत. निकृष्ट दर्जाचा कोळसा पॉवर प्लांटला पाठवला जात आहे. हा फार मोठा कोळसा घोटाळा आहे. महिन्याला १५० कोटी रुपयांपर्यंत काळ्या बाजारातून कमावले जात आहेत. याकडे सरकारचे लक्ष नाही. पण आम्ही या घोटाळ्याकडे सरकारचं लक्ष वेधणार आहोत, असेही आमदार वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले.

अधिवेशन वादळी होणार..

काही कामे अत्यंत बोगस सुरू आहेत, त्या कामांमध्ये दर्जा नाही. कायदा व सुव्यवस्था पूर्णतः विस्कळीत झालेली आहे. राज्यात (Maharashtra) महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. बॅंकांवर दरोडे पडत आहेत. चंद्रपूरला (Chandrapur) तर स्टेट बॅंक ऑफ इंडियावर दरोडा पडला. कायदा कुठे आहे? मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे. कोट्यवधी रुपयांची कामे सरकारच्या मर्जीतील लोकांना दिली जात आहेत. हे सर्व विषय आम्ही अधिवेशनात मांडू. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरेल, यामध्ये काहीही शंका नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com