मतदार ‘त्या’ नेत्याला आणि कॉंग्रेसला चांगलाच धडा शिकवणार आहे...

आमचा एक माणूस फोडून त्याच दिवशी विजयी झाल्याचा भास काॅंग्रेसने (Congress) निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण दोनच दिवसांत त्यांच्या पायाखालची वाळू घसरली.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : महाविकास आघाडीने त्यातल्या त्यात कॉंग्रेसने (Congress) विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमचा एक नेता फोडला. त्याच्यासोबत भाजपचे ५०-६० नगरसेवक फोडून भाजपला खिंडार पाडण्याचे मनसुबे रचले. पण आता त्यांचे हे सर्व मनसुबे उधळले जाणार आहेत आणि ‘त्या’ नेत्याला आणि कॉंग्रेसला एकसंघ असलेले आमचे सदस्य मतदार चांगलाच धडा शिकवणार आहे, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस, भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

बावनकुळे म्हणाले, बसपाच्या नगरसेवकांनी विधानपरिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती मिळाली. मतदान करायचे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. त्यांच्या पक्षाने तसे ठरवले असेल, तर ठीक आहे. पण आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही. कारण ही निवडणूक आम्ही आजच जिंकलो आहोत. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आमचा एक माणूस फोडून त्याच दिवशी विजयी झाल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण दोनच दिवसांत त्यांच्या पायाखालची वाळू घसरली.

आमचे सर्व सदस्य मतदार आपआपल्या सोयीने आणि आपआपल्या व्यवस्थेनुसार सहलीला गेले आहेत. पक्षातच फोडाफोडी आणि अंतर्गत कुरबुरी ही कॉंग्रेसची संस्कृती आहे, आमच्या पक्षाची नाही. भाजप शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो आणि आमचे सर्व मतदार सदस्य वेळेवर पोहोचून पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील. कॉंग्रेस आणि आमच्यातून गेलेल्या त्या नेत्याला या निवडणुकीच्या निकालानंतर चांगलाच धडा मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.

जनता तिन्ही पक्षांना धडा शिकवेल..

महाविकास आघाडी सरकारने षड्यंत्र रचून ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. त्यांना माहिती होते, की सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन केलेला अध्यादेश टिकणार नाही. तरीही त्यांनी तसेच केले आणि आम्ही ओबीसींचे तारणहार आहोत, असा आव आणला. या सरकारला ओबीसींच्या जागांवर पैसेवाले, सुभेदार लोक आणायचे आहेत, असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला.

Chandrashekhar Bawankule
बावनकुळे म्हणाले, या सरकारला ओबीसींच्या जागांवर पैसेवाले, सुभेदार आणायचे आहे...

ओबीसी समाज मूर्ख नाही. सर्वकाही त्यांच्या लक्षात आले आहे आणि सरकारमधील तिन्ही पक्षांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. न्यायालयाने अतिशय स्पष्ट निकाल दिला असताना राज्य सरकारने ८ महिने टाइमपास केला. या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे इम्पिरीकल डेटा तयार केला असता, तर आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला असता. सरकारमधले मंत्री बोलघेवडे आहेत. ते केवळ मोर्चे, मेळावे करीत राहिले. म्हणायला ओबीसी आयोग तयार केला. पण त्यांना संसाधने दिली नाही, निधी दिला नाही. आयोगाचे हात बांधून ठेवण्याचे काम राज्य सरकारने केले. या लोकांनी ओबीसींच्या मुद्द्य़ाचा फुटबॉल करून ठेवला. त्यामुळे ओबीसी जनता त्यांना आता सोडणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com