Vikram Gokhale : नागपूर विमानतळावर तुटली होती विक्रम गोखलेंची चप्पल...

विक्रम गोखले यांची आठवण सांगताना छायाचित्रकार नानू नेवारे म्हणाले, एका नाटकाच्या निमित्ताने विक्रम गोखले (Vikram Gokhale) नागपुरात आले होते. प्रयोग आटोपून ते दिल्लीला (Delhi) जाणार होते.
Vikram Gokhale
Vikram GokhaleSarkarnama

नागपूर : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी काल पुण्यात अखेरचा श्वास घेतला. गेले १७ दिवस त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. गोखले यांना मधुमेह आणि जलोदर झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारांना प्रतिसाद देणं हळूहळू बंद झालं आणि त्यांची प्राणज्योत मालवली. नागपुरात (Nagpur) आले असता ते विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलाचे काम सुरू असताना ते साहित्य संघात गेले होते. लवकरच नाट्यगृह बांधा आणि मी प्रयोग करायला येईल, असे त्यावेळी त्यांनी साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, त्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली.

विक्रम गोखले यांची आठवण सांगताना छायाचित्रकार नानू नेवारे म्हणाले, एका नाटकाच्या निमित्ताने विक्रम गोखले (Vikram Gokhale) नागपुरात आले होते. प्रयोग आटोपून ते दिल्लीला (Delhi) जाणार होते. प्रयोग संपला आणि सभागृहातून ते विमानतळावर (Nagpur Airport) पोहोचले. तेथेच त्यांची चप्पल तुटली. त्यापूर्वी माझ्या फोटो स्टुडिओमध्ये आले असल्याने त्यांनी मला एक चप्पल घेऊन ये म्हणून फोन केला. बर्डीवरून त्यांच्या चपलांचे दोन जोड घेतले आणि ते विमानतळावर पोहोचवून दिल्याची आठवण नेवारे यांनी सांगितली.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर त्यांच्या नागपुरातील आठवणींना उजाळा देताना नाट्यकलावंत व निर्माते किशोर आयलवार म्हणाले, पंचम संस्थेच्या माध्यमातून विक्रम गोखले आणि ‘मी माझ्या मुलांचा’, ‘माझी मैत्री’, ‘बॅरिस्टर’ अशी अनेक नाटके सादर केली. रंगस्वानंद संस्थेशी त्यांचा जवळचा संबंध होता. विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलाचे काम सुरू असताना ते साहित्य संघात गेले होते. लवकरच नाट्यगृह बांधा आणि मी प्रयोग करायला येईल, असे त्यांनी साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले होते; मात्र त्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली.

नाटकाचा प्रयोग असल्यास एक तास आधीच ते सभागृहात पोहोचायचे. वेळेवर प्रयोग सुरू झाला पाहिजे, नाटक सुरू असताना सभागृहात कुठलाही अडथळा नको, असा त्यांचा आग्रह असायचा. अतिशय शिस्तीचे आणि तेवढेच प्रेमळ होते. नाटकाच्या आधी ते स्वतःच सर्व प्रेक्षकांना मोबाईल बंद ठेवण्यास सांगत होते. त्यामुळे नाटक सुरू असताना मोबाईल वाजला की, प्रयोग थांबवून देत. कवी ग्रेस यांची त्यांना भेट घ्यायची होती. त्यामुळे त्यांची वेळ घेतली आणि त्यांच्यासोबत गेलो. पंधरा मिनिटे बसू आणि निघू म्हणून त्यांच्या धंतोली येथील निवासस्थानी गेलो आणि जवळपास चार तास दोघांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. उमरेड मार्गावरील पंचवटी वृद्धाश्रमात ते जात होते आणि तेथील लोकांना मदत करायचे, असेही आयलवार म्हणाले.

Vikram Gokhale
कोणाची माय व्यायली आहे, माझ्यावर टीका करायला - विक्रम गोखले

सामाजिक संस्थांना आवर्जून भेटी..

विक्रम गोखले यांना सामाजिक कार्याची खूप आवड होती. नागपुरात आले की, ते हमखास येथील संस्थांना भेट देऊन मदत करायचे, अशी आठवण निवेदक प्रकाश एदलाबादकर यांनी सांगितली. नागपुरात आले असता त्यांनी दिघोरीच्या वृद्धाश्रमात तसेच नंदनवन दुर्बल मनस्क शाळा येथे भेट दिली होती. ज्येष्ठ अभिनेते व ख्यातनाम व्यावसायिक अजित दिवाडकर यांनी ‘बॅरिस्टर’ची आठवण सांगितली. ‘बॅरिस्टर’ नाटकासाठी गोखले नागपुरात आले होते, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com