Vijay Wadettiwar : ‘त्या’ विषयाला आम्ही फुल स्टॉप दिला, आता सरकारला पायऊतार व्हावे लागेल !

Nana Patole : दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते.
Vijay Wadettiwar and Nana Patole
Vijay Wadettiwar and Nana PatoleSarkarnama

Vijay Wadettiwar on Disput with Nana Patole : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील वादाचा दुसरा अंक काल (ता. ९) बघायला मिळाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यासंदर्भात आज आमदार वडेट्टीवार यांना विचारणा केली असता, त्या विषयाला आम्ही आता फुल स्टॉप दिलेला आहे, असे ते म्हणाले. (We have now given full stop to that topic)

आज (ता. १०) दुपारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, हा विषय आता संपलेला आहे. त्यांनी काय म्हटलं, मी काय म्हटलं हा आमचा अंतर्गत विषय होता. त्यावर आम्ही पडदा टाकला आहे. आता कुठलाही विषय शिल्लक राहिलेला नाही. हा वाद दिल्लीपर्यंत गेला, असं काही लोक सांगत आहेत. पण त्यात काही तथ्य नाही. समज-गैरसमजातून निर्माण झालेले काही प्रश्‍न महाराष्ट्रात आहेत. त्यातून काही विषय पुढे आले. पण आता त्या विषयांना आम्ही फुल स्टॉप दिलेला आहे.

आज कर्नाटकात मतदान आहे. महाराष्ट्रातले सत्ताधारी कर्नाटकमध्ये जाऊन ढोल वाजवत होते, आता त्यांचा ढोल वाजवून झाला असेल. निवडणुका-निवडणूक करता-करता आता त्यांचं पोट भरलं असेल, तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडं मोडलं आहे. निवडणुकीनंतर त्यांच्या पोटाची चिंता मिटली असेल, तर आता शेतकऱ्यांच्या पोटाची चिंता त्यांनी केली पाहिजे.

शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि सरकारकडे मदतीसाठी आशेने बघतो आहे. होतं, नव्हतं ते शेतकऱ्याच्या हातून गेलं आहे. खरिपाच्या हंगामातील मका, धान, सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातून गेलेले आहे. सत्ताधाऱ्यांची भूक मिटली असेल, तर शेतकऱ्याची भूक मिटवण्यासाठी पुढे यावे, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला.

Vijay Wadettiwar and Nana Patole
Vijay Wadettiwar News: … तर या देशात लोकशाही फक्त नावालाच राहील, असं का म्हणाले वडेट्टीवार ?

सत्तासंघर्षाचा निकाल येत्या एक-दोन दिवसांत येईल, अशी अपेक्षा आहे. मध्यंतरी जे वातावरण निर्माण केलं गेलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संदर्भात विशेषतः अजित पवारांच्या (Ajit Pawar) संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकूणच परिस्थिती पाहता न्यायालयाचा निकाल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लागेल आणि त्यांना पायऊतार व्हावे लागेल, अशीच चर्चा सर्वत्र आहे. कायद्यानुसार हा निकाल नक्कीच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाईल, असे आमदार वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचारासाठी जेव्हा गेले, तेव्हा ते खोके घेऊन गेले, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेला आहे. याबाबत विचारले असता, त्या विषयावर आता मला फार काही बोलायचे नाही. कारण येत्या एक-दोन दिवसांत काय निकाल लागायचा तो लागणार आहे, असे आमदार वडेट्टीवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in