Vijay Wadettiwar : गोळीबार प्रकरणात पालकमंत्र्यांचे लक्ष नाही, वडेट्टीवारांचा आंदोलनाचा इशारा...

Chandrapur : जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या राजकीय नेत्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे.
Vijay Wadettiwa
Vijay WadettiwaSarkarnama

Attack on Congress leader Santosh Rawat : काॅंग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ल्याचा मास्टर माईंड शोधून त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अन्यथा जिल्हाभरात आंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी दिला. (Otherwise we will organize a protest in the whole district)

गुरुवारी (ता. ११) रावत यांच्यावर मूल येथे गोळीबार करण्यात आला होता. त्यात ते बचावले. जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या राजकीय नेत्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. रावत यांचे कुणाशीही वैर नाही. मात्र, त्यांच्यावर पाळत ठेवून गोळी झाडली, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. घटनेच्या तीन दिवसानंतरही हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही.

कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये, यासाठी आरोपीला तत्काळ अटक करावी. बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस मजबूत होत असताना दिसत आहे. परंतु काही मंडळींना कॉंग्रेसची मजबुती खपत नाही. त्यामुळे निष्ठावंतांचा आवाज दाबण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असावा, अशी शंका आमदार वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

या प्रकरणात पालकमंत्री लक्ष घालतील, अशी अपेक्षा होती. परंतु पालकमंत्र्यांनी सदर प्रकरणात आजपर्यंत लक्ष घातल्याचे दिसत नाही, ही बाब खेदजनक आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. यावेळी प्रकाश देवतळे, नंदू नागरकर, गंगाधर वैद्य, सुनील उनाटकर, राकेश रत्नावार, नितीन उराडे, गुरू गुरनुले, चित्रा डांगे, श्यामकांत थेरे, अंबिकाप्रसाद दवे, राजेश अडुर, घनश्याम येनुरकर आदी उपस्थित होते.

Vijay Wadettiwa
Chandrapur BJP : काॅंग्रेसनंतर भाजपमध्येही बदलचे वारे, भोंगळे, डॉ. गुलवाडेंचे अध्यक्षपद अधांतरी !

गुरूवारी झालेल्या गोळीबारात कॉंग्रेस संतोष रावत सुदैवाने बचावले. त्याच्या डाव्या हाताला गोळी चाटून गेली. या घटनेने राजकीय वर्तुळ हादरले. दरम्यान मूल येथे सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला होता. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या अटकेसाठी निदर्शनेही केली होती. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी नऊ पथक गठीत केली आहेत.

मूल येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेसमोरून दुचाकीने रावत जात असताना चारचाकी (एम.एच.३४-६१५२) वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. हल्लेखोरांनी चेहरे झाकले होते. गोळी झाडताच हल्लेखोर नागपूरच्या दिशेने पसार झाले. यात हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला जखम झाली.

Vijay Wadettiwa
Chandrapur Loksabha : तेव्हा ‘दारू विरुद्ध दूध’च्या मुकाबल्यात दारूचा झाला होता विजय, पण आता...

ही घटना राजकीय (Political) वैमनस्यातून, व्यावसायिक स्पर्धेतून किंवा व्यक्तिगत कारणातून झाली, याबाबत अजूनही विविध चर्चा सुरू आहेत. अज्ञात हल्लेखोरांचा घराच्या प्रवेश द्वारावरच रावत यांना शूट करण्याचा डाव होता. त्यामुळेच दोन दिवसांपासून हल्लेखोरांची रेकी सुरू होती. गुरुवारी घटनेच्या दिवशी रावत यांच्या निवासस्थानी काही लोक भेटायला आले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर रावत घराच्या बाहेर पडले. त्यामुळे हल्लेखोरांचा घराच्या प्रवेशद्वारावर शूट करण्याचा डाव फसला होता.

या हल्ल्यात वापरलेल्या चारचाकी वाहनाचा क्रमांक बनावट असल्याचे पोलिस (Police) तपासात समोर आले. रावत यांच्या हल्ल्यातील आरोपींना शोधण्यासाठी एकूण नऊ तपास पथक गठीत करण्यात आलेली आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी स्वतः मूल ला भेट दिली. हल्ला कुणी केला माहीत नाही. परंतु बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC Election) आणि जिल्हा नोकरी भरतीत त्रास देणारे जीवघेणा हल्ला करू शकतात, असे रावत म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com