काँग्रेसमध्ये वाद : धानोरकरांच्या कार्यकर्त्यांच्या राऊतांना शुभेच्छा पण वडेट्टीवारांना वगळून

दोघांतील शीतयुद्धाच्या चर्चा नेहमी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरु असते.
Congress workers put banners on ocassion of Nitin Raut birthday
Congress workers put banners on ocassion of Nitin Raut birthdaysarkarnama

चंद्रपूर : गतवैभव मिळविण्यासाठी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते परिश्रम घेत असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात मात्र नेत्यांमध्ये धुसफूस सुरु आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना शुभेच्छा देताना कॉंग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांचा विसर पडला. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांची छायाचित्र शुभेच्छा फलकावर आहे. मात्र वडेट्टीवार यांना यातून डावलण्यात आले. जिल्हा परिषद आणि महानगर पालिका निवडणुक येऊ घातली आहे. यापार्श्वभूमीवर पक्षांतर्गत दुफळीचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.

वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर कॉंग्रेसचे जिल्ह्यातील बडे नेते. या दोघांतील शीतयुद्धाच्या चर्चा नेहमी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरु असते. शहर आणि जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदावेळी याचे प्रत्यंतर आले. वडेट्टीवार आणि धानोरकर यांनी यापदांवर आपल्या माणसांची वर्णी लागावी, यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. शेवटी या दोघात समेट झाला. शहर कॉंग्रेसचे अध्यक्षपद धानोरकर समर्थक रामू तिवारी आणि ग्रामीणचे अध्यक्षपद वडेट्टीवारांचे खास प्रकाश देवतळे यांना मिळाले. त्यानंतर प्रदेश कार्यकारिणीच्या नियुक्त्यांवरुन धुसफूसची चर्चा होती. या सर्व घटनाक्रमात वडेट्टीवार आणि धानोरकर अशा दोन गटात कॉंग्रेस विभागली गेली, असे चित्र कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाले आहे. या दोघांनी मात्र आपसातील नाराजी कधीच जाहीरपणे उघड केली नाही.

Congress workers put banners on ocassion of Nitin Raut birthday
भंगाराचा व्यवसाय करता करता मलिकांनी आपली मतीही भंगरात विकली!

दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा फलक शहरात लागले. यात कॉंग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष आणि पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना स्थान मिळाले नाही. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार अविनाश वारजुकर आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांना फलकावर वर स्थान देण्यात आले. खाली शुभेच्छूकांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रामू तिवारी, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनशाम मुलचंदानी, महेश मेंढे, शिवा राव आणि विनोद दत्तात्रेय यांचा समावेश आहे. शहरातील मुख्य चौकात हे फलक लागले आहे. या फलकावर पालकमंत्र्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Congress workers put banners on ocassion of Nitin Raut birthday
बीडमधील माफियाराजला सत्तेतल्या लोकांचा पाठिंबा : पंकजांचा धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा

कॉंग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्यांचे प्रतिबिंब या फलकातून उमटेल, अशी चर्चा आहे. कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी शुभेच्छा फलक नेमके कुणी लावले, याची माहिती नसल्याचे सांगितले. ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी यामुळे विरोधकांना बळ मिळेल. हा प्रकार बरोबर नाही. पक्षशिस्तिचा भंग आहे, अशी नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री आपल्याच माणसांना महत्व देतात. त्यांचीच कामे करतात, असा कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. याच रागातून वडेट्टीवारांना डिवचण्यासाठी त्यांना शुभेच्छा फलकावरून जाणीवपूर्वक डावलण्यात आले, अशी चर्चा कॉंग्रेसच्या वर्तुळात आहे. विशेष म्हणजे ही शुभेच्छा फलक नेमकी लावली कुणी याबाबत कुणीच बोलायला तयार नाही. चंद्रपूर विधानसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार महेश मेंढे यांनी ही 'प्रिटींग मिस्टेक' असल्याचे सांगून यावर बोलणे टाळले. या फलकांबाबत पालकमंत्री आणि खासदार धानोरकर सुद्धा अनभिज्ञ आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com