चंद्रपुरात विजय वडेट्टीवारांचाच माहौल, ४ नगरपंचायतींवर कॉंग्रेसचा झेंडा...

त्यांच्या (Sudhir Mungantiwar) क्षेत्रातील पोंभुर्णा नगरपंचायतीवर भाजपने (BJP) १० जागा जिंकत बहुमत मिळविले. पोर्भुर्णयात प्रथमच वंचीतने २ जागा जिंकत खाते उघडले.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

नागपूर : नगरपंचायत निवडणुकीच्या आज जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसने (Congress) बाजी मारीत वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) आपले नेतृत्व सिध्द केले. सहा नगरपंचायतींपैकी तिन नगरपंचायत निवडणुकींमध्ये काँग्रेस बहुमताने निवडून आली, तर दोन नगरपंचायतीत काँग्रेस प्रमुख पक्ष ठरला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar) आपला बालेकिल्ला वाचविण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या क्षेत्रातील पोंभुर्णा नगरपंचायतीवर भाजपने १० जागा जिंकत बहुमत मिळविले. पोर्भुर्णयात प्रथमच वंचीतने २ जागा जिंकत खाते उघडले. याठिकाणी शिवसेनेला ४ जागांवर विजय मिळाला आहे.

माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पोंभुर्णाच्या निकालाकडे जिल्हाचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणेच येथे भाजपाने बहूमत मिळविले आहे. 17 पैकी भाजपाच् 10 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेने 4 जागा जिंकल्या. काँग्रेसला येथे केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर वडेट्टीवार यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सावली येथे काँग्रेसने 14 जागा जिंकल्या. भाजपाला येथे ३ जागा जिंकता आल्या. सिंदेवाही-लोनवाही नगर परिषदमध्ये काँग्रेसने 13 जागा जिंकल्या. भाजपाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपणा, जिवती आणि गोंडपिपरी या तीन नगर पंचायतींत काँग्रेसने सरशी घेतली. कोरपणा न.प.वर काँग्रेसला बहूमत मिळाले. काँग्रेसने 12 जागांवर विजय मिळवीला. भाजपला 4 जागा जिंकता आल्या. गोंडपिपरीमध्ये काँग्रेस पहील्या क्रमांकाचा पक्ष ठरला. काँग्रेस 7, भाजप 4, राष्ट्रवादी 2, शिवसेनेने 2 जागांवर विजय मिळविला. जिवती न.प.मध्ये काँग्रेस 6, राष्ट्रवादी 6, गोंडवाना गणतंत्र पार्टीला 5 जागेवर विजय मिळाला.

ही निवडणूक सरळसरळ महाविकास आघाडीचे तीन पक्ष आणि भारतीय जनता पक्षात होणे अपेक्षित होते. पण महाविकास आघीडीतील तीन्ही पक्ष ही निवडणूक स्वतंत्रपणे लढले. त्यामुळे भाजप कदाचित मोठा पक्ष ठरू शकतो. पण ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रिपणे जर लढली गेली असती, तर आज भाजपचा मोठा पराभव याठिकाणी झाला असता. महाविकास आघीडीच्या तिन्ही पक्षांतील नेत्यांना उचकवण्याचे काम भाजपतकडून नेहमीच सुरू असते. त्यामुळे हे तिन पक्ष स्थानिक स्तरावर एकत्र येऊ शकले नाहीत. अन्यथा आजचा निकाल काही वेगळाच असता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com