विजय वडेट्टीवार म्हणाले, आता १२ बलुतेदारांची मुलेही होतील डॉक्टर...

अनेक वर्षांपासून अनेक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात ही लढाई लढलेली आहे. खरे पाहता केंद्र सरकारनेच हा निर्णय घेण्याची अपेक्षा होती, असेही वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

नागपूर : भारताच्या घटनेत तरतूद असतानाही १२ बलुतेदारांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी आरक्षण नव्हते. पण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात ते मिळाले आहे. देशाचे पंतप्रधान ओबीसी असताना आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होती. त्यांनी भ्रमनिरास केला. पण सर्वोच्च न्यायालयाने अखेर ओबीसींच्या पारड्यात न्याय टाकला. त्यामुळे आता १२ बलुतेदारांची मुलेही डॉक्टर होऊन आपल्या समाजाचे नाव उंचावू शकणार आहेत, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले.

वैद्यकीय शिक्षणात ओबीसींना २७ टक्के आरक्षण कायम ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय स्वागतार्ह आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. हा निर्णय न्यायालयाने दिल्याचे आम्हाला समाधान आहे. सात वर्षे ओबीसी पंतप्रधान (Prime Minister) असूनही ओबीसींना ते न्याय देऊ शकले नाहीत, ही खेदाची बाब आहे. घटनात्मक तरतूद असताना ते आजवर मिळाले नव्हते. हे लक्षात आणून देताना देशात ओबीसी पंतप्रधान सत्तेवर असताना करावा लागलेला संघर्ष अपेक्षाभंग करणारा असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. ओबीसी बांधवांनी आणखी एक लढाई जिंकल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. अनेक वर्षांपासून अनेक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात ही लढाई लढलेली आहे. खरे पाहता केंद्र सरकारनेच हा निर्णय घेण्याची अपेक्षा होती, असेही वडेट्टीवार म्हणाले.

राज्याच्या वाट्याला ज्या १५ टक्के जागा मिळतात त्या कोट्यातून २७ टक्के आरक्षण दिले गेले आहे. सारासार विचार करता देशात ओबीसींच्या जेवढ्या जागा असतात, त्यामध्ये २७ टक्के आरक्षण ओबीसींना नव्हते आणि केंद्र सरकारची भूमिका याबाबत नेहमीच दुटप्पीपणाची राहिली आहे. केंद्राला हे आरक्षण द्यायचेच नव्हते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. यातील ओबीसी, व्हिजेएनटी अशा बहुजन समाजातील तरुणांना मोठ्या प्रमाणात डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असेही ते म्हणाले.

मोदींकडून होत्या मोठ्या अपेक्षा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी असल्यामुळे समाजाला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, त्यांनी या विषयात दाखवलेल्या अनास्थेमुळे ओबीसी समाजाचा भ्रमनिरास झाला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय देणारा, हक्क देणारा आहे. ओबीसींना आज जे काही मिळाले, सर्वोच्च न्यायालयामुळेच असेही मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘या’ कारणामुळे पुढे ढकलली कॅबिनेटची बैठक...

लोकलबाबत मुख्यमंत्री घेतील निर्णय..

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. रोज वाढणारी रुग्णांची संख्या धडकी भरवणारी आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढू शकतो. यापूर्वी आलेल्या लाटेपासून नागरिक काहीही शिकल्याचे दिसत नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेची आठवण जरी मनात आणून स्वत:वर नियंत्रण ठेवले तर १५ ते २० दिवसांत ही लाट नियंत्रणात येऊ शकते, लोकलबाबत सध्या निर्णय नाही, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. नाइट कर्फ्यू आवश्यक आहे. जेणेकरून समूह संसर्ग टाळता येईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने निर्बंध आणखी कठोर केले आहेत. लॉकडाऊन सरकारला लावायचा नाही. मात्र, नागरिकांनी स्वतःला आवरायला हवे. सरकारने निर्बंध कठोर केल्यानंतरही नागरिकांची बाजारात होणारी गर्दी कमी झालेली नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवायचा असेल तर स्‍वतः शिस्त लावणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज वाढणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेसोबतच नागरिकांमध्येही धडकी भरलेली आहे. मात्र, लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन लावण्याचा विचार सध्या तरी राज्य सरकारचा नाही. मात्र, नियंत्रण मिळविण्यासाठी नियम अधिक कठोर करावे लागतील. नियम कडक करण्यासंदर्भात टास्क फोर्ससोबत चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

संक्रांतीनंतर नियंत्रण शक्य..

आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. घरातून बाहेर निघण्यावर निर्बंध लादायला हवे. स्वतः काळजी घेतली तरच नियंत्रण मिळविणे शक्य आहे. संक्रांतीनंतर ही लाट कमी होईल, अशी शक्यता आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in