Vidhan Parishad election News : नागपूर शिक्षक मतदारसंघातून कोण रिंगणात ?

Nagpur Teachers Constituency : आधी आमच्या प्रमुख विरोधकांचा उमेदवार कोण, हे बघू मग आम्ही घोषणा करू.
vidhan parishad election
vidhan parishad election

Nagpur Teachers Constituency : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.उमेदवारीवरुन पक्षांच्या बैठका सुरु आहेत.

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष एकमेकांचे उमेदवार घोषीत होण्याची वाट बघत आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १२ जानेवारीलाच दोन्ही प्रमुख उमेदवार कोण असतील, याची उत्सुकता आहे.

मागील निवडणुकीत शिक्षक भारती, शिक्षक परिषद, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघ आणि काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार होता. त्यावेळी भाजपने पाठिंबा दिलेल्या शिक्षक परिषदेचे नागो गाणार निवडून आले होते. पण आता त्यांच्या मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. गाणार यांची प्रतिमा स्वच्छ आहे. पण त्यांच्या कारकिर्दीत कामे झाली नाही. सभागृहात त्यांचा आवाज ऐकू आला नाही, अशा तक्रारी त्यांच्याबद्दल आहेत. त्यामुळेच त्यांना बदलण्याची मागणी जोर धरत आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा पाठिंबा कुणाला, याची उत्सुकता चांगलीच ताणली जात आहे. भाजपचे पूर्व विदर्भातील सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच नागपुरात झाली. पण उमेदवार कोण, हे मात्र ठरले नाही. तिकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, आधी आमच्या प्रमुख विरोधकांचा उमेदवार कोण, हे बघू मग आम्ही घोषणा करू.

vidhan parishad election
Solapur News : निवडणुकीचे आव्हान देणाऱ्या देशमुखांना काडादींनी करुन दिली 'त्या' पराभवाची आठवण

दुसरीकडे शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबल संपूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरले आहेत. झाडेंना काँग्रेसच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे. कारण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसला मदत केली होती आणि त्यांचे अभिजित वंजारी हे उमेवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसने आता आम्हाला पाठिंबा जाहीर करावा, असे राजेंद्र झाडे यांचे म्हणणे आहे.

vidhan parishad election
Sanjay Raut News : शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, १६ आमदार लवकरच अपात्र ठरतील ; राऊतांचा दावा

सुधाकर अडबले लढणारच

शिक्षक भारतीच्या मागणीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही आणि काँग्रेस त्यांना पाठिंबा देईल की नाही, याची खात्री स्वतः शिक्षक भारतीचे उमेदवार झाडे यांनाही नाही. त्यामुळे त्यांना स्वळावर लढावं लागेल, असं दिसतंय. भाजप आणि काँग्रेसचे ठरले नसले तरी शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून सुधाकर अडबले हे निश्चितपणे लढणार आहे.

नेत्यांची गोची

नागो गाणार यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपमध्ये अनेकांचा विरोध आहे. भाजपकडून माजी महापौर कल्पना पांडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, अनिल शिवणकर, प्रा. संजय भेंडे हे इच्छुक आहेत. गाणारांना पाठिंबा दिल्यास या चौघांची नाराजी राहणार आहे. त्याचा परिणाम निवडणूक निकालतही दिसू शकतो. त्यामुळे नेत्यांची गोची झाल्यासारखी दिसत आहे.

निवडणुकीची पुनरावृत्ती

भाजपने आपला स्वतंत्र उमेदवार दिल्यास शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबल यांच्या लढाईत भाजपचा फायदा होईल, असेही एक गणित मांडण्यात येत आहे. पण शिक्षक परिषदेतर्फे गाणार लढल्यास भाजप नुकसान होण्याचीही एक शक्यता आहे. त्यामुळेच भाजपला सारासार विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा पदवीधर निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in