Vidarbh Sahitya Sammelan : दर्दी नसेल तरी चालेल, गर्दी हवीच : उपस्थितीसाठी प्राचार्यांच्या फतव्यामुळे नवा वाद!

Vidarbh Sahitya Sammelan : साहित्याशी संबंध नसतानाही नाईलाजाने कर्मचाऱ्यांना आयोजनस्थळी उपस्थित!
Vidarbh Sahitya Sammelan
Vidarbh Sahitya Sammelan Sarkarnama

Vidarbh Sahitya Sammelan : दर्दी नसेल चालेल मात्र गर्दी हवीच, अशी भूमिका एरव्ही कार्यक्रमांच्या आयोजकांचा असतो. चंद्रपुरात आजपासून सुरु झालेले ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन सुद्धा याला अपवाद नाही. या संमेलनाच्या आयोजकांपैकी एक सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी संमेलनात प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे,असा फतवाच काढला आहे. अनुपस्थितीचे नोंद घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे साहित्याशी संबंध नसतानाही नाईलाजाने कर्मचाऱ्यांना आयोजनस्थळी भटकावे लागत आहे.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, सर्वोदय शिक्षण मंडळ आणि सुर्यांश साहित्य व संस्कृती मंच, चंद्रपूर साहित्य संमेलनाचे आयोजक आहे. येथील प्रियदर्शीन इंदिरा गांधी सभागृहात साहित्य संमेलनाला आज शुक्रवारपासून प्रारंभ झाला. समारोप १८ डिसेंबरला होईल. तत्पूर्वीच या साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद काटकर यांना १४ डिसेंबरला एक फतवा जारी केला. ते सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालित सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य आहे. त्यांनी वरिष्ठ, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नावे एक लेखी आदेश जारी केला.

परिक्षेशी संबंधित शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वगळून सर्वांनी ग्रंथदिडी, उद्घाटन सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समारोपीय सत्रासाठी उपस्थित राहणे बंधकारक केले. आपले मंडळच आयोजक आहे. त्यामुळे साहित्य संमेलन यशस्वी झाले पाहिजे. त्यासाठी महाविद्यालयात नियोजित वेळी आपली हजेरी लावून संमेलनस्थळी उपस्थित रहावे. जे कर्मचारी संमेलनाकडे फिरकणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेण्यात येईल, असा धमकीवजा इशाराही प्राचार्य डॉ. काटकर यांनी या आदेशात दिला.

Vidarbh Sahitya Sammelan
Sushma Andhare यांच्या वक्तव्याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक; दिली थेट डोंबिवली बंदची हाक

गर्दी जमविण्यासाठी आम्हाला बोलविले जात आहे. आमचा साहित्याशी संबधच नाही, अशी नाराजी एका विज्ञान शाखेच्या प्राध्यापकाने 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली. संस्था संमेलनाची आयोजक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करणे गैर नाही.परंतु लेखी फतवा काढून धमकी देण्याचा प्रकार गंभीर आहे. आम्ही शासनाकडून वेतन घेतो. आमच्या नियुक्तीपत्रात आमच्या कामाचे स्वरुप ठरले आहे. त्या कामाव्यतिरिक्त जबदरस्ती केली जावू शकत नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे या आयोजकांपैकी एक गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहे. डॉ. काटकर यांनी असा लेखी आदेश काढल्याची आपल्याला कल्पना नाही, असे सांगून हात वर केले. विशेष म्हणजे गोंडवाना विद्यापीठाकडून किंवा शिक्षक संहसंचालकांना यासंदर्भात कळविणे बंधनकारक आहे. त्यांच्या परवागीनेच असे लेखी आदेश काढले जावू शकतात. परंतु अशी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. शासनाचे वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम न करण्याचा लेखी सल्ला यानिमित्नाने डॉ. काटकर यांनी दिला आहे, असे शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Vidarbh Sahitya Sammelan
Suhas kande VS Dada Bhuse : कांदे-भुसे यांच्यातील विस्तव जाणार का ? ;कांदे-मुख्यमंत्री यांच्यात खलबते

काटकर म्हणाले की, ''आमची संस्था आयोजकांपैकी एक आहे. त्यामुळे कर्मचारी, प्राध्यापकांना उपस्थिती रहावे, अशी अपेक्षाकरणे गैर नाही. त्यासाठी लेखी आदेश काढला आहे. यात काहीही चुकीचे नाही. ''

सिनेट सदस्य असलेले दिलीप चौधरी म्हणाले, ''संमेलनाला उपस्थिती राहण्याची विनंती करु शकता. कर्मचाऱ्यांवर लेखी आदेश काढून जबदरस्ती करता येणार नाही. त्यांना ठरवून दिलेल्या कामांसाठी शासन वेतन देते. हा चुकीचा प्रकार आहे. कुलगुरूंना जाब विचारणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com