Praful Patel Vs Nana Patole : प्रफुल्ल पटेल-नाना पटोले यांच्यात पुन्हा शाब्दिक वॉर; नैतिक-अनैतिकेतून वार-पलटवार
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक वॉर पुन्हा एकदा रंगण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला प्रफुल्ल पटेल यांनी ही अनैतिक आघाडी असल्याची टीका केली होती. त्याला पटोले यांनी ‘स्वाभिमानाने एकत्रित येण्याला अनैतिकता म्हणत नाहीत,’ असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा वाद वाढू शकतो. (Verbal war again between Praful Patel and Nana Patole)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशातील विरोधकांची विस्कळीत इंडिया आघाडी ही सामना करू शकणार नाही. ही आघाडीच अनैतिक आहे, असा हल्लाबोल खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. ते म्हणाले की, देशात नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही. ही विस्कळीत आघाडी मोदी यांचा सामना करू शकत नाही. इंडिया आघाडीच्या बैठका ह्या केवळ फोटोसेशनपुरत्या आहेत. त्यांना आघाडीच्या लोगोचं एकमताने अनावरण करता आलं नाही. देश जुळणारच नाही तर जिंकणार कसा? त्यामुळे ही अनैतिक आघाडी आहे.
खासदार प्रफुल्ल पटेल यांची टीका काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली असून पटेल यांचे जुने राजकीय शत्रू नाना पटोले यांनी उत्तर दिल आहे. पटोले म्हणाले की, महायुती सरकारसोबत ईडीमुळे त्यांचे अनैतिक संबंध जुळले आहेत. प्रफुल्ल पटेल हे स्वतःबद्दल बोलले आहेत का? कारण ईडी आणि अनैतिकता सारखीच आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग नरेंद्र मोदी सरकार हे करत आहे. देशातील प्रत्येक नागरिक हे जाणून आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना लगावला. त्यामुळे आगामी काळात राज्यात इंडिया आघाडीचे नेते आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.