Sudhir Mungantiwar : ‘वंदे मातरम्’ हा फक्त नारा नाही, तर राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास..

अभिवादन दूरध्वनी संभाषणाच्या सुरुवातीस व्हावे, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.
Devendra Fadanvis and Sudhir Mungantiwar
Devendra Fadanvis and Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात 'हॅलो नव्हे - वंदे मातरम्' या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ आज गांधी जयंतीच्या दिवशी वर्धा येथून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच "वंदे मातरम्"नी शासकीय कार्यालयातील अभिवादन दूरध्वनी संभाषणाच्या सुरुवातीस व्हावे, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.

‘जन गण मन...‘ हे आपले राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्‘ हे राष्ट्रीय गीत हे सर्वमान्य झालेले आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी जय हिंद तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते. शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर "वंदे मातरम्" हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप येईल, असे मुनगंटीवार म्हणाले.

“वंदे मातरम्” या संबोधनाने प्रत्येक शासकीय कार्यालयात दूरध्वनीवर व प्रत्यक्ष संवाद होत असताना सुरुवात झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकेल, यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत.

१. सर्व शासकीय कार्यालयांत दूरध्वनीवर / भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा अधिकारी / कर्मचारी यांनी संवाद साधल्यास सुरुवातीचे अभिवादन म्हणून "हॅलो"संबोधन न वापरता, "वंदे मातरम्" म्हणावे.

Devendra Fadanvis and Sudhir Mungantiwar
Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, या निर्णयामुळे वनकर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल !

२. शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालये, शासन सहाय्यित/ अनुदानित / अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा/ महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प/ उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांतही दूरध्वनीवर किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास, सुरुवातीला "हॅलो" असे न म्हणता "वंदे मातरम्" असे संबोधन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरही संवाद साधताना "वंदे मातरम्" असे संबोधन करावे.

३. कार्यालय/संस्था येथे दूरध्वनीवरून होणाऱ्या संवादात सुरुवातीस "वंदे मातरम्" हे संबोधन वापरले जाईल यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.

४. कार्यालयात/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यांगतांनाही सार्वजनिक जीवनात "वंदे मातरम्" ने संबोधन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.

५. ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.

६. विविध बैठका/सभांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करताना ती "वंदे मातरम्" या शब्दांनी करावी.

Devendra Fadanvis and Sudhir Mungantiwar
भव्य सैनिकी शाळा बघून केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले, सुधीर मुनगंटीवार म्हणजे लाजवाब..!

वंदे मातरम् अभियानाचा प्रचार आणि प्रसिद्धीसुद्धा करण्यात येणार आहे. "वंदे मातरम्" हे संबोधनात्मक व अभिवादनात्मक स्वरूपात, प्रत्येकाने उच्चारावे यासाठी जाणीव जागृती व प्रचार-प्रसार प्रसिद्धीसाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. "वंदे मातरम्" संबोधन अभियानासाठी वृत्तपत्रे, वाहिन्या, समाज माध्यमे इत्यादींमधून महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने माहिती देण्यात येणार आहे. "वंदे मातरम्" बाबत प्रचार-प्रसार व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या गीताचा इतिहास व त्याच्याशी निगडित घटना यांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.

लघु चित्रपटाच्या माध्यमातून "वंदे मातरम्" बाबत जाणीव जागृती करण्यात येईल. "वंदे मातरम्" हा फक्त नारा किंवा संबोधन नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास आहे, याबाबत माहिती प्रसृत करावी व

हॅलो ऐवजी "वंदे मातरम्" या शब्दांनी अभिवादन करण्यात येईल. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांबरोबर निमशासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम व आस्थापना यांना कार्यालयात दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत व सहकारी यांना संवाद साधण्याच्या सुरुवातीस हॅलो असे न म्हणता "वंदे मातरम्" असे अभिवादन करावे, याबाबत आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे. या विषयातील शासनादेश आज जारी करण्यात आला आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com