Vanchit Aghadi News : वंचित युवा आघाडी ॲक्शन मोडवर, आंदोलनांतील गुन्हे परत घेण्यासाठी करणार एलगार !

Sujat Ambedkar : सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात एलगार मेळावा घेतला जाणार आहे.
Vanchit Bahujan Yuva Aghadi
Vanchit Bahujan Yuva AghadiSarkarnama

Vanchit Bahujan Yuba Aghadi News : जनहितार्थ राजकीय, सामाजिक आंदोलने करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे परत घेण्यासाठी अनेक शासन निर्णय असतानासुद्धा गुन्हे परत घेतले जात नाहीत. त्यासाठी सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित युवा आघाडी ३ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मुंबई येथे एलगार मेळावा घेणार आहे. (Vanchit Bahujan Yuva Aghadi on action mode)

वंचित युवक प्रदेश अध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा युवा एलगार पुकारला जाणार असल्याचे युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील गुन्हे व खटले मागे घेण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी एक्शन मोडवर असून राजकीय सामाजिक गुन्हे परत घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राजकीय अथवा सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्हे परत घ्यावे. त्यासाठी मोठी मोहीम सुरू करण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन करण्यात आल्याची घोषणा वंचित बहुजन युवा आघाडीने केली आहे.

सार्वजनिक हिताच्या समस्या व अन्याय अत्याचाराचे घटना घडल्यानंतर राजकीय व सामाजिक संघटना बंद पुकारतात, घेराव घालतात, निदर्शने करून आंदोलन केले जाते. त्यात दाखल गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने खैरलांजीपासून ते रमाबाई आंबेडकर नगर, कोरेगाव भीमा, मराठा क्रांती मोर्चा आणि इतर कोणत्याही आंदोलनात आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे हे राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाचे असल्याने ह्या गुन्ह्यातील खटले तपासाअंती मागे घेण्याची तरतूद महाराष्ट्र शासन गृह विभागाने वेळोवेळी काढण्यात आलेल्या अनेक शासन निर्णयात नमूद आहे.

कोरेगाव भीमा (जिल्हा पुणे) तीन जानेवारी बंद आणि मराठा क्रांती मोर्चासह अगदी आरे जंगल आंदोलन आणि कोविड काळासह इतर सर्व राजकीय सामाजिक आंदोलनांमधील गुन्हे परत घेण्यासाठी अनेक शासन निर्णय असूनसुद्धा सदर गुन्हे परत घेतले गेले नाहीत. त्यात १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनाचे गुन्हे आणि खटले परत घेण्याबाबत तसेच मराठा क्रांती मोर्चा प्रकरणात देखील गुन्हे परत घेण्याची तरतूद आहे.

Vanchit Bahujan Yuva Aghadi
BJP vc Vanchit : खोटे श्रेय घेण्याचे भाजपचे सोंग वंचितने ‘असे’ उघडे पाडले !

हे गुन्हे काढून घेताना केवळ दोन अटी घालून हे सर्व गुन्हे व खटले निकाली काढले जाऊ शकतात. यासाठी वंचित युवा आघाडी राज्य पातळीवर मोहीम उभी करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात ज्या राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत. त्या सर्व पक्षाचे किंवा संघटना ह्यांचे कार्यकर्ते अनेक वर्षे पोलीस स्टेशन आणि न्यायालयात चकरा घालत असतात. याची दखल कुठलाही राजकीय पक्ष घेत नाही. सत्ताधारी पक्ष शासन निर्णय काढून मोकळे होतात, त्याची अंमलबजावणी गांभीर्याने होत नसल्याने कार्यकर्ते भरडले जातात.

वंचित युवा आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आवाहन करून जुन्या नव्या सर्व गुन्ह्यांची माहिती, एफआयआर नंबर, न्यायप्रविष्ट असल्यास कोर्ट केस नंबर, सर्व आरोपींची नावे, मोबाईल नंबर व गुन्ह्यात दाखल केलेली कलमे ही सर्व माहिती मागवली आहे. ३ मे रोजी दुपारी १२ वाजता मुंबईतील (Mumbai) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) भवन येथे एलगार मेळावा होणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com