वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन बुलडाण्यात, नागराज मंजुळे करणार उद्घाटन...

साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्याहस्ते केले जाणार असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिली.
वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन बुलडाण्यात, नागराज मंजुळे करणार उद्घाटन...
Ravikant Tupkar, Nagraj ManjuleSarkarnama

नागपूर : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २३ एप्रिल रोजी बुलडाणा (Buldana) येथे महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्याहस्ते केले जाणार असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली.

वामनदादा कर्डक यांच्या नावाने राज्यात पहिल्यांदाच होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाबाबत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी काल पत्रकार परिषदेत माहिती दिली. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक अर्जून डांगळे, मुंबई हे राहणार आहेत. यावेळी मुख्य निमंत्रक मंत्रालयीन सचिव सिद्धार्थ खरात, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. सदानंद देशमुख, कार्याध्यक्ष माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप जाधव व स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी १०.३० वाजता हे उद्घाटन होणार असून तत्पूर्वी ग्रंथ प्रदर्शनी व विक्री स्टॉलचे उद्घाटन केले जाणार आहे.

शाहीर डी. आर. इंगळे यांच्या 'लढाई जाती अंताची' या काव्यसंग्रहाचे तसेच डॉ. प्रतिभा वाघमारे - खोब्रागडे लिखित वामनदादांच्या गजलांचे सौंदर्य विश्व या पुस्तकाचे व प्रा. रवींद्र साळवे यांनी संपादीत केलेल्या साहित्य संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच डॉ. सागर जाधव यवतमाळ, माधवराव गायकवाड अहमदनगर, विलास जंगले हिंगोली, वत्सलाबाई जनार्दन गवई भादोला, शाहीर चरण जाधव, मुंबई यांचा तसेच वामनदादा कर्डक राज्यस्तरीय गायन स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे संचालन रवींद्र सावळे व आभार प्रदर्शन शशिकांत इंगळे करणार आहेत.

पहिल्या सत्रात १२.३० ते १.३० यावेळेत वामनदादा कर्डक राज्यस्तरीय गायन स्पर्धेतील विजेत्यांचा कार्यक्रम होणार आहे. संचालन शशिकांत जाधव तर आभार प्रदर्शन महेंद्र बोर्डे करणार आहेत. १.३० ते ३ यावेळी परिसंवादाचे दुसरे सत्र होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. महेंद्र भवरे, मुंबई हे राहणार असून वामनदादांच्या काव्यातील वैश्विक जाणिवा या विषयावर डॉ. उत्तम अंभोरे औरंगाबाद, वामनदादांच्या गझल रचना या विषयावर डॉ. प्रमोद वाळके आणि वामनदादांच्या काव्यातील प्रतिभा या विषयावर प्रा. डॉ. प्रतिभा वाघमारे - खोब्रागडे या सहभागी होणार आहेत. संचालन रणजितसिंह राजपूत तर आभार प्रदर्शन राजेंद्र काळे करणार आहेत. तिसऱ्या सत्रात मी पाहिलेले, वाचलेले वामनदादा या विषयावर आधारीत टॉक शो होणार आहे. यामध्ये प्रा. डॉ. श्रीधर अंभोरे जालना, प्रा. डॉ. दिलीप महालिंगे औरंगाबाद, माधवराव गायकवाड अहमदनगर, भाई अशांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम हे सहभागी होणार असून संचालन राहुल खांडेकर पुणे तर आभार प्रदर्शन कुणाल पैठणकर करणार आहेत.

Ravikant Tupkar, Nagraj Manjule
मोठी बातमी : परब यांचे निकटवर्ती आरटीओ अधिकारी खरमाटे अडचणीत

चौथ्या सत्रात ४.३० ते ५.३० या वेळेत निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक रवींद्र इंगळे चावरेकर राहणार असून या कवी संमेलनात डॉ. गोविंद गायकी, अनंत राऊत पुणे, डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, नारायणराव जाधव येळगावकर, ॲड. विजयकुमार कस्तुरे आदी सहभागी होणार असून सूत्रसंचालन किरण डोंगरदिवे व आभार प्रदर्शन अमोल पैठणे करणार आहेत. ५.३० ते ७ यावेळी सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय सत्र होणार आहे. यावेळी अर्जून इंगळे, रविकांत तुपकर, भाऊ भोजने, आर. आर. वानखडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी सुरेश साबळे हे ठराव वाचन करणार असून सूत्रसंचालन रमेश आराख तर आभार प्रदर्शन पंजाबराव गायकवाड करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ ते रात्री दहा वाजेपर्यंत ही रात्र शाहिरांची हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शाहीर प्रतापसिंग बोदडे, शाहीर नागसेन सावदेकर, डॉ. किशोर वाघ, धम्मानंद सिरसाट हे सहभागी होणार असून सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रमेश आराख करणार आहेत.

वामनदादांच्या नावाने घेतले जाणारे हे राज्यातील पहिलेच साहित्य संमेलन असून हे संमेलन ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही यावेळी स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला. ताराबाई शिंदे साहित्य नगरी असे नाव या साहित्य संमेलन परिसराला दिले जाणार असून एका प्रवेशद्वाराला स्व. नरेंद्र लांजेवार तर एका प्रवेशद्वाराला शाहीर गवई - मिसाळ यांचे नाव दिले जाणार असल्याचीही माहिती यावेळी तुपकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला प्रा. रवींद्र इंगळे, शाहीर डी. आर. इंगळे, कुणाल पैठणकर, प्रा. शशिकांत जाधव, शैलेश खेडकर, शाहीनाताई पठाण, विजयाताई काकडे आदींची उपस्थिती होती. महाकवी वामनदादा कर्डक यांचे साहित्य हे चळवळीला बळ देणारे होते. वामनदादांचे साहित्य श्रम-कष्ट करणाऱ्यांना समर्पित होते. त्यांचे साहित्य वैश्विक होते. वामनदादांच्या तब्बल पाच हजारांहून अधिक कविता, गीते, गझल असून त्यांच्या साहित्यात सर्वसामान्यांचा आवाज, विद्रोह, तळमळ असल्याचे रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.