वडेट्टीवार म्हणाले, भाजपने फूट पाडण्यासाठी हा अजेंडा राबविला...

आता परिस्थिती शांत आहे. मात्र आगळीक खपवून न घेता कायदा आपले काम करेल, याची ग्वाहीसुद्धा मंत्री वडेट्टीवार Minister Vijay Wadettiwar यांनी दिली.
Minister Vijay Wadettiwar
Minister Vijay WadettiwarSarkarnama

चंद्रपूर : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ काल अमरावतीमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आज अमरावती बंदची हाक दिली. या बंददरम्यानही हिंसा झाली. भाजपने फूट पाडण्यासाठी हा अजेंडा राबविल्याचा आरोप, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.

त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्र आणि देशभर उमटत आहेत. दरम्यान भाजपने राजकीय लाभ घेण्यासाठी आजचा अमरावती बंद आणि मोर्चा आयोजित केला. त्याला हिंसक वळण लागले. पण आता मात्र परिस्थिती शांत आहे. मात्र आगळीक खपवून न घेता कायदा आपले काम करेल, याची ग्वाहीसुद्धा मंत्री वडेट्टीवार यांनी दिली. चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते. अमरावतीत झालेल्या घडामोडींनंतर नागरिकांनी संयम राखावा, असेही ते म्हणाले.

काल आणि आज झालेल्या तोडफोडीच्या आणि जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (१), (२), (३) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून आदेश देण्यात आला आहे. प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे की, अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

Minister Vijay Wadettiwar
कौमी एकतेसाठी ओळखले जाते अमरावती, हा गालबोट लावण्याचा प्रयत्न...

संचारबंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही. तसेच, पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही. कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नयेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये शिक्षा पात्र अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून संपूर्ण अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com