नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळेच उमेश कोल्हेंचा खून! पोलिसांची कबुली...

या प्रकरणाचा तपास अद्याप अमरावती Amravati) पोलिसांकडेच आहे. एनआयएच्या (NIA) तपासाबाबत कुठलीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
NIA in Amravati on Umesh Kolhe Murder
NIA in Amravati on Umesh Kolhe MurderSarkarnama

नागपूर : गेल्या काही दिवसांत वादग्रस्त ठरलेल्या भाजप नेत्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायी उमेश कोल्हे यांनी पोस्ट केली होती. त्यातून त्यांचा खून करण्यात आला, या निष्कर्षाप्रत अमरावती पोलिस पोहोचली असल्याची माहिती अमरावतीचे डिसीपी विक्रम साळी यांनी पत्रकारांना दिली.

या प्रकरणाचा तपास अद्याप अमरावती (Amravati) पोलिसांकडेच (Police) आहे. एनआयएच्या (NIA) तपासाबाबत कुठलीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. तीन दिवसांपूर्वी भाजपचे (BJP) प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी हा आरोप केला होता आणि एनआयएकडे तपास सोपवण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी उमेश कोल्हे खून प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविला होता आणि त्यानंतर एनआयएची टीम अमरावतीमध्ये दाखल झाली. पण या टीमचा तपास बंदद्वार सुरू असल्यामुळे त्याबाबत कुठलीही माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.

श्यामचौक नजीकच्या हनुमान मंदिराच्या गल्लीतील घंटीघड्याळाच्या जवळ उमेश प्रल्हादराव कोल्हे (वय ५४) या व्यापाऱ्याची झालेली हत्या ही लूटमार करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (ता.२३) सायंकाळी दोघांना अटक केली. त्यानंतर एक एक करून काल या प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर आज डीसीपी विक्रम साळी यांनी पत्रकारांना उपरोक्त माहिती दिली.

NIA in Amravati on Umesh Kolhe Murder
आता गडकरी-फडणवीस यांनी एकत्र येऊन मोदी-शहांना टक्कर द्यावी!

अमरावती तहसील कार्यालयाजवळ उमेश कोल्हे यांचे अमित मेडिकल स्टोअर नावाचे प्रतिष्ठान आहे. नेहमीप्रमाणे मेडिकल बंद करून श्री. कोल्हे न्यू हायस्कूल मेन जवळ हनुमान मंदिराच्या गल्लीतून घराकडे जात होते. त्यांच्या मागे मुलगा आणि सून हे दोघे दुसऱ्या दुचाकीने येत होते. गल्लीत अंधारात अनोळखी व्यक्तींनी उमेश कोल्हे यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. मंगळवारी (२० जून) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली होती. लूटमार करण्याचा तिघांचा उद्देश होता, असे पोलिसांनी प्रथमदर्शनी तपासात सांगितले होते. साथीदारांसह दबा देऊन गल्लीत अंधारात बसलो होतो, अशी कबुली अटकेनंतर दोन आरोपींनी दिली होती. कालच्या कारवाईनंतर अटकेतील आरोपींची संख्या सहा झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com