Umesh Kolhe Murder Case: फार्मासिस्ट उमेश कोल्हे खून प्रकरण; NIAचा 'हा' धक्कादायक खुलासा

Umesh Kolhe Murder Case: ... म्हणून तबलिगी जमातच्या कट्टर इस्लामवाद्यांनी हत्या केली.
Police on Umesh Kolhe Murder
Police on Umesh Kolhe MurderSarkarnama

Umesh Kolhe Murder Case: अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यानंतर प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी उमेश कोल्हे यांची तबलिगी जमातच्या कट्टर इस्लामवाद्यांनी हत्या केली असे एनआयए(NIA) ने येथील न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केलं आहे. (Umesh Kolhe Murder Case)

Police on Umesh Kolhe Murder
Gram panchayat Results : गोपीचंद पडळकरांनी करुन दाखवलं; 'मातोश्रीं'च्या गळ्यात सरपंचपदाची माळ!

उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्याकांडप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात एनआयएने दावा केला आहे की, तबलिगी जमातच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी उमेश कोल्हे यांची हत्या केली होती.

Police on Umesh Kolhe Murder
Gram panchayat election result: चंद्रकांत पाटील यांना धक्का; मुलीचा विजय मात्र संपूर्ण पॅनेलचा धक्कादायक पराभव

'NIA'कडून11 आरोपींना अटक

तबलिगी जमातीच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी उमेश कोल्हे यांची हत्या केल्याचं एनआयएच्या तपासात समोर आलं आहे. न्यायालयात आरोपपत्र दाखल करत एनआयएनं ही माहिती दिली आहे. तबलिगी जमातच्या कट्टरपंथी इस्लामीवाद्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी उमेश कोल्हे यांची हत्या केली. तबलिगी जमातच्या सदस्यांनी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कोल्हे यांची हत्या केली असा दावा एनआयएनं आरोपत्रात केला आहे. एनआयएने याप्रकरणी 11 आरोपींना अटक केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com