Umesh Dange : मी शब्द दिला नव्हता, येण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असंच सांगितलं होतं !

Nana Patole : नितीन साळवे यांनी नाना पटोलेंची भेट घेतली.
Umesh Dange News
Umesh Dange NewsSarkarnama

Nana Patole's colleague Umesh Dange News : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सहकारी उमेश डांगे यांच्यामुळे नाना पटोले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमाला आले नाही, असा आरोप सराफा असोसिएशनचे नितीन साळवे यांनी आज सकाळी नाना पटोले यांच्या घरी जाऊन केला.

मी नितीन साळवे यांना कुठलाही शब्द दिला नव्हता. त्यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. नाना पटोलेंच्या नियोजनात आम्ही कार्यक्रम टाकला आहे. कार्यक्रमाला ते येतील, असे सांगितले होते.

पण प्रत्येकच कार्यक्रमात जाणे जमेलच असे नाही. कधी कधी ऐन वेळेवर काही महत्वाचे विषय उद्भवल्यास नियोजित कार्यक्रम रद्द करून वेळेवर आलेले काम करावे लागते, असे पटोलेंचे सहकारी उमेश डांगे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

कार्यक्रमाची पत्रिका छापण्यापासून ते पोस्टर्स, बॅनर्स लावल्याचीही माहिती उमेश डांगें यांना दिली. नाना पटोले येतील, असेही डांगेंनी मला सांगितले होते. पण नंतर नंतर ते मला टाळू लागले. माझा कॉल घेत नव्हते, भेटत नव्हते.

त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे पटोले कार्यक्रमाला येतील, असे समजून आम्ही पूर्ण तयारी केली. पण केवळ या उमेश डांगेंमुळे पटोले आले नाही, असा जो आरोप नितीन साळवे यांनी लावला आहे, तो धादांत खोटा आहे, असेही उमेश डांगे म्हणाले.

उमेश डांगे यांच्यावर आरोप केल्यानंतर नितीन साळवे यांनी नाना पटोलेंची भेट घेतली. ‘निवडणूक असल्यामुळे मला ऐन वेळेवर मतदारसंघात जावे लागले. त्यामुळे मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही.

तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.’, असे नाना पटोलेंनी सांगितल्याचे साळवे म्हणाले. यानंतर साळवेंचे समाधान झाले. नेमकी हीच गोष्ट मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करीत होतो, पण साळवे समजूनच घेत नव्हते, असेही डांगे यांनी सांगितले.

Umesh Dange News
Nana Patole : शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत अन् त्यांच्या मित्रांचा फायदा करून देतात !

नाना पटोले (Nana Patole) काॅंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष आहेत भरपूर कार्यक्रम असतात. सर्वांचेच निमंत्रण स्वीकारून वेळेचा ताळमेळ जुळवावा लागतो. कार्यक्रमाला येतो, असे म्हणणे म्हणजे काही चूक नाही. सर्वच कार्यक्रमांना जाण्याचा नाना पटोलेंचा प्रयत्न असतो. पण कधी कधी ते शक्य होत नाही.

अशा वेळी काही कार्यक्रम सोडावे लागतात. नितीन साळवे यांच्या कार्यक्रमाच्या दिवशी पण अशीच काही अडचण आली होती. त्यामुळे ते कार्यक्रमाला जाऊ शकले नाही. पण येवढ्या लहान गोष्टीसाठी अशी आगपाखड करणे आणि काहीच्या काही आरोप करणे योग्य नाही, असे उमेश डांगे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com